लातूर : लातूर जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाला नाही़ परिणामी, जिल्ह्यात तीव्र पाणी व चाराटंचाई आहे़ चारा टंचाईवर उपाययोजना म्हणून ‘‘अझोला’ही शेवाळवर्गीय वनस्पती लागवडीचा पशुसंवर्धनचा उपक्रम वरदान ठरणार आहे़ लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत १०० युनिट सुरू होणार आहेत़ त्यासाठी १५ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. लातूर जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून समाधानकराक पाऊस झाला नाही़ त्याचा परिणाम शेती व्यवसायावर झाला आहे़ पाणी टंचाईसोबतच चाराटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे़ त्यावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत वैधानिक विकास महामंडळाने आर्थिक आधार दिला आहे़ त्यातूनच लातूर जिल्ह्यासाठी १५ लाखांचा निधी दिला आहे़ हा निधी चाराटंचाईच्या उपाययोजनेवर खर्च केला जाणार आहे़ पशुसंवर्धन विभागाकडून या ‘अझोला’चे मदर युनिट लातूर येथे सुरू करण्यात आले आहे़ या मदर युनिटसाठी १ लाखाचा निधी तर प्रत्येक तालुक्याला १ लाख ४० हजारांची आर्थिक मदत दिली जाणार आहे़ त्या मदतीच्या आधारे अर्धा फुट उंचीचा व चार बाय सहा असा हौद तयार करण्यात येणार आहे़ या अझोलाचे बीज टाकून त्याचे उत्पादन घेतले जाणार आहे़ यासाठी तालुक्याच्या ठिकाणी याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे़ प्रशिक्षणासोबतच आवश्यक असणारे साहित्य दिले जाणार आहे़ यामध्ये शेड नेट, शिल्पोलीन मिनरल मिक्सर आदी साहित्याचा समावेश असणार आहे़ त्याचे प्रात्यक्षिक लातूरच्या मदर युनिटमध्ये चालू आहे़ पशुसंवर्धन विभागाने आपल्या मदर युनिटमध्ये मंगळवारी ‘अझोला’ चे प्रात्यक्षिक सुरू केले आहे़ पुढील आठ दिवसात त्याचे उत्पन्न नियमित सुरु होणार आहे़ प्रतिदिवस एक ते दोन किलोचे उत्पन्न या एका हौदात काढले जाणार आहे़ त्याचा लाभ ज्या शेतकाऱ्यांना किमान दोन दुधाळ जनावरे असतील त्यांना अझोलाचे बी देण्यात येणार आहे़ लातुरात याचे ‘अझोला’चे मदर युनिट करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी अझोला लाभदायी ठरणार आहे़ सर्व पशुपालकांना लाभ व्हावा, यासाठी प्रत्येक तालुक्यात १०० युनिट सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली़ (प्रतिनिधी)
‘अझोला’मुळे होणार चारा टंचाईवर मात
By admin | Updated: May 1, 2015 00:50 IST