शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

आयुर्वेदिक व्यावसायिक ‘डॉक्टर’ नव्हे ‘वैद्य’? फर्मानाविरोधात 'निमा' संघटना आक्रमक

By विजय सरवदे | Updated: January 19, 2024 18:15 IST

आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिक असताना ‘ॲलोपॅथी’चा उपचार करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे फर्मान

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या नावापुढे ‘डॉक्टर’ नव्हे ‘वैद्य’ असा उल्लेख करावा. एवढेच नाही, तर ‘ॲलोपॅथी’ची योग्य अर्हता प्राप्त नसतानादेखील काही जण ‘ॲलोपॅथी’चा उपचार करतात, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे फर्मान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रंगनाथ तुपे यांनी जारी केले असून, याविरुद्ध ‘बीएएमएस’ डॉक्टरांच्या ‘निमा’ या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुपे यांनी १५ जानेवारी रोजी गंगापूर तालुक्यातील ‘ॲलोपॅथीक’ डॉक्टर वगळता उर्वरित ‘बीएएमएस’, ‘बीयूएमएस’, ‘बीएचएमएस’, ‘डीएचएमएस’, या पदवीधारक वैद्यकीय व्यावसायिकांना एका नोटिसीद्वारे इशारा दिला आहे की, आपले शिक्षण ज्या ‘पॅथी’तून झाले, त्या ‘पॅथी’ची प्रॅक्टीस सोडून ‘ॲलोपॅथी’चा उपचार रुग्णांवर करतात. अर्हता नसताना देखील ‘ॲलोपॅथी’चा उपचार देणे, आपल्या दवाखान्यात एमबीबीएस अथवा एमडी डॉक्टरांच्या भेटी दाखवून भडक जाहिराती करून रुग्णांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनात आले आहे. अशा वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, डॉ. तुपे यांच्या या पत्रावर ‘निमा’ (एनआयएमए) संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र झोल व सचिव डॉ. ज्ञानेश्वर चौधर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. वैद्यकीय व्यवसायाची कसलीही पदवी नसताना तालुक्यात अनेक बंगालीबाबू राजरोसपणे दवाखाने चालवत आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाई करायचे सोडून जे महाराष्ट्र भारतीय चिकित्सा परिषदेकडे (महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन) नोंदणीकृत आहेत, अशा वैद्यकीय व्यावसायिकांना नोटिसा देऊन भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये ‘बीएएमएस’ डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत, याचा विसर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुपे यांना पडलेला दिसतोय, असे डॉ. चौधर यांचे म्हणणे आहे.

‘ॲलोपॅथी’चा ब्रीज कोर्स आवश्यकगंगापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुपे यांच्या पत्रामुळे ‘बीएएमएस’ डॉक्टरांसंबंधी समाजात गैरसमज पसरला असून यावर ‘निमा’ संघटनेने आक्षेप घेतला आहे, याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘ॲलोपॅथी’चा उपचार अथवा औषधी लिहून देण्यासाठी ‘बीएएमएस’धारकांना देखील ‘ब्रीज कोर्स’ अनिवार्य आहे. ज्यांनी हा कोर्स केला असेल, ते ‘ॲलोपॅथी’ची प्रॅक्टीस करू शकतात. आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिकांना आपल्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लावण्याचा अधिकार आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयdoctorडॉक्टरAurangabadऔरंगाबाद