दुचाकी चालवत असताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा,दारू अथवा कोणत्याही अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालवू नये, वाहन चालविताना वाहनाचा वेग कमी असावा. वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करू नये. दुचाकीवर दोन पेक्षा अधिक इसम बसवून वाहन चालवू नये. वाहन चालविताना नेहमी सीट बेल्टचा वापर करावा. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यासाठी देऊ नये. महामार्गावर आपले वाहन विरुद्ध दिशेने चालवू नका, महामार्गाचे सध्या काम चालू असून रोडचा अंदाज घेऊनच आपले वाहन चालवावे असे आवाहन सहा. पोलीस निरीक्षक सुरेश भाले, पोलीस हवालदार, बाबूराव जाधव, दीपेश शिरोडकर, अभिजित गायकवाड यांनी केले. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर जाणाऱ्या बैलगाड्या ना रिफ्लेक्टर लावून त्यांना वाहतूक नियमाबाबत प्रबोधन करून वाहतूक नियमाविषयचे पत्रके वाटप करण्यात आली.
फोटो : मक्रणपूर येथे वाहनधारकांना मार्गदर्शन करताना पोलीस.
मक्रणपूर येथे वाहनधारकांना मार्गदर्शन करताना पोलीस.