शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

अविनाश डोळस यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 20:52 IST

औरंगाबाद : आंबेडकरी चळवळीचे प्रवाही, भारिप बहुजन महासंघाचे नेते तथा प्रसिद्ध साहित्यिक प्रा. अविनाश डोळस यांचे रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. सायंकाळी भीमनगर भावसिंगपुरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आंबेडकरी विचारांचा पाईक : विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचा वैचारिक मार्गदर्शक हरपलाऔरंगाबाद : आंबेडकरी चळवळीचे प्रवाही, भारिप बहुजन महासंघाचे नेते तथा प्रसिद्ध साहित्यिक प्रा. अविनाश डोळस यांचे रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. सायंकाळी भीमनगर भावसिंगपुरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

औरंगाबाद आणि महाराष्टÑाच्या साहित्य विश्वात आंबेडकरी विचारवंत म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रा. डोळस यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त सकाळी कळताच अनेकांना धक्काच बसला. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास छातीत दुखू लागल्याने त्यांना एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते; मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी जॅकलीन, मुलगी आदिती आणि आशय व व्हिजन ही दोन मुले आहेत.

विद्यार्थिदशेपासूनच चळवळीत असणारे प्रा. डोळस हे दलित युवा आघाडीत सक्रिय राहिले. नंतर ते डॉ. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव, एक पाणवठा’ या मोहिमेशीही जोडले गेले. नंतर ते भारिप बहुजन महासंघासोबत अखेरपर्यंत काम करीत राहिले. साहित्यिक आणि कार्यकर्ता अशा दोन्ही भूमिकांमधून त्यांनी वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. मूळचे आंबेदिंडोरी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील रहिवासी असलेल्या प्रा. डोळस यांनी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून एम. ए. मराठी पूर्ण केले. नंतर ते येथील मिलिंद महाविद्यालयात रुजू झाले. कृतिशील कार्यकर्ता आणि आंबेडकरी विचारांचा प्रवाही, अशी त्यांची ओळख होती. सहज मैत्री व्हावी असे प्रा. डोळस यांचे व्यक्तिमत्त्व होते.

साहित्यविश्वात आणि राजकीय क्षेत्रात, तसेच विविध विचारपीठांवर ते जे बोलत ते मनापासून बोलत, अशी त्यांची ख्याती होती. साहित्यिक म्हणून त्यांनी वैचारिक आणि सामाजिक विषयांवर प्रामुख्याने लेखन केले. ते नाट्यलेखकही होते. १९९० मध्ये नांदेड येथील अखिल भारतीय दलित नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. २०११ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या १२ व्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून १९९६ मध्ये लोकसभेची निवडणूकही लढविली होती. विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना वैचारिक दिशा देणारा मार्गदर्शक, अशी त्यांची ओळख होती.

त्यांच्या अंत्यसंस्काराला भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.नंदनवन कॉलनीतील निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघून छावणीतील ‘सूरजकुंड’ स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी झाला.प्रा. डोळस यांच्या निवासस्थानी प्रकाश आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह असंख्य चाहत्यांनी भेट देऊन डोळस कुटुंबियांचे सांत्वन केले. नंदनवन कॉलनी, जिन्सीपुरा, नेहरू चौक, छावणी परिसरातून सूरजकुंड येथे पोहोचल्यानंतर प्रा. डॉ. भन्ते सत्यपाल यांच्या प्रार्थनेनंतर प्रा. डोळस यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. यावेळी आमदार इम्तियाज जलील, आमदार सुभाष झांबड, डॉ. भागवत कराड, अ‍ॅड. अंकुश भालेकर, प्राचार्य प्रताप बोराडे, प्रा. एल. बी. रायमाने, प्रा. एच. एम. देसरडा यांच्यासह अनेकांनी फुले वाहून प्रा. डोळस यांना अखेरचा निरोप दिला.प्रा. डोळस यांना श्रद्धांजलीपर विचार मांडणाºयांची मोठी संख्या पाहता खासदार बॅ. प्रकाश आंबेडकर यांनी त्या सर्व चाहत्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता तिसºया दिवशी सर्व चाहत्यांनी श्रद्धांजलीपर विचार मांडावेत, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

अंत्ययात्रेत देवीदास तुळजापूरकर, मंगल खिंवसरा, रतन पंडागळे, अ‍ॅड. मनोहर टाकसाळ, अ‍ॅड. बी. एच. गायकवाड, अ‍ॅड. महादेव आंधळे, अ‍ॅड. काळदाते, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. खेडगीकर, प्रा. दिलीप बडे, डॉ. वाल्मीक सरवदे, प्रा. संजय मून, प्रा. ऋषिकेश कांबळे, सुधाकर झिने, राम पेरकर, अशोक सायन्ना, रफिक अहेमद, किशोर कच्छवाह, डॉ. मनोहर जिल्ठे, अ‍ॅड. सतीश बोरकर, भीमराव सरवदे, अर्जुन सरवदे, शिरीष रामटेके, संजय पवार, प्रा. सुनील मगरे, प्रा. संभाजी वाघमारे, अमित भुईगळ, प्रा. प्रकाश शिरसाठ, प्रा. प्रताप कोचुरे, अ‍ॅड. एम.एन. देशमुख, सुभाष जाधव, बंडू प्रधान, अशोक कांबळे, कुंदन जाधव, प्रदीप श्ािंदे, संजय जगताप, डॉ. शंकर अंभोरे, प्रा. राजू पगारे, रमेश जोगदंड, दामूअण्णा श्ािंदे, चंद्रसेना शेजवळ (कन्नड), डॉ. वामन जगताप, श्रीराम भोगे यांच्यासह सर्व क्षेत्रातील पुरुष-महिला मोठ्या संख्येने सहभागी होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद