शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंचलित हवामान केंद्रांचे भिजत घोंगडे

By admin | Updated: August 29, 2014 01:26 IST

भास्कर लांडे , हिंगोली केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘स्वयंचलित हवामान केंद्रास’ अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. तीन वर्षांपूर्वी घोषणा करून गावोगावी जागा तेवढी आडून धरली.

भास्कर लांडे , हिंगोलीकेंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘स्वयंचलित हवामान केंद्रास’ अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. तीन वर्षांपूर्वी घोषणा करून गावोगावी जागा तेवढी आडून धरली. आजघडीला मराठवाड्यात सर्वत्र केंद्र सुरू झाले असताना आयुक्त कार्यालयाकडे मेल, फॅक्स आणि फाईल जावूनही या केंद्राचे भिजत घोंगडे कायम आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे हा प्रकार घडत आहे. देशाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला स्वंयचलित हवामान केंद्र राज्यात सर्वत्र राबविण्यात आला. जिल्ह्यात त्यानुसार ४७ ठिकाणांची निवड सुरूवातीला करण्यात आली होती. अखेरीस ३० हवामान केंद्र उभारण्याचे निश्चित करण्यात आले. कृषी विभागाने महसूल मंडळनिहाय जागाही घेतली. दरम्यान ,आयुक्तांकडे या केंद्राची माहिती ई-मेल, फॅक्स आणि फाईलद्वारे देण्यात आली. आज त्याला तीन वर्षांचा कालवाधी लोटला तरी या केंद्रांचे भिजत घोंगडे कायम आहे. केंद्रासाठी निधी मिळत नाही, अशीही काही समस्या नसल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या निधीची गरज नाही. जिल्हा कार्यालयास याबाबत पूर्ण अधिकार असताना याबद्दल अधिकाऱ्यांची अनास्था दिसून येते. आजमितीला या केंद्रांचा विसरच कार्यालयास पडला. परिणामी, असे केंद्र स्थापन करण्यासाठी एकाही अधिकाऱ्याची धडपड दिसून येत नाही. तीन वर्षांपासून जरासीही हालचाल कृषी विभागाने केलेली नाही. दरम्यान, दोन कृषी अधिकारी आणि दोन तंत्र अधिकारी येवून गेले. वर्षभरापासून आलेल्या शिवाजी पवार यांनाही या केंद्राचा विसर पडला. विकासात भर घालणाऱ्या या प्रकल्पाविषयी एकही लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाही. अधिकाऱ्यांना कोणी जाबही विचारत नाही. मुळात उत्पादकांच्या हिताविषयी कोणीही अग्रही भूमिका घेणारा लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी नाही. सस्त लोकप्रतिनिधी आणि धिम्न प्रशासानामुळे जिल्ह्यातील कृषी विकास खुंटल्याचे ‘कृषी दिनानिमित्त’ म्हणावे लागेल.