शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचा पारा ४३ अंशांवर; शहरवासीय उकाड्याने हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:48 IST

पावसाळ्याच्या तोंडावर सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे.

ठळक मुद्देयंदाच्या मोसमातील नवा उच्चांक 

औरंगाबाद : शहरात गेल्या तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आली असून, सोमवारी शहराचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तापमानाचा हा यंदाच्या मोसमातील नवा उच्चांक ठरला आहे. शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून, नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. शनिवारी ४२.२, रविवारी ४२.३ अंश सेल्सियस अशी तापमानाची नोंद करण्यात आली होती. 

रविवारी आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान नोंदविले गेले होते.  सोमवारी त्यात ०.८ अंशांनी वाढ झाली आणि तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. चिकलठाणा वेधशाळेत कमाल तापमान ४३.१ आणि किमान तापमान २७.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. त्यामुळे यंदाचे आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान ठरले आहे.उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे उकाडा अधिक तीव्रतेने जाणवत आहे. सायंकाळी ऊन कमी झाले तरी वातावरणात उकाडा कायम राहत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव शहरवासीयांना येत आहे. दुपारच्या वेळी घरात प्रचंड उकाडा सहन करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. वाढत्या उन्हाने अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारांनी प्रत्येक जण त्रस्त होत आहे.

आणखी उकाडा वाढणारऔरंगाबाद शहराच्या कमाल तापमानात तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे. महिनाअखेरीस कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

आगामी दिवसातील तापमानाचा अंदाजदिनांक     कमाल      किमान२६ मे    ४२.०      २९.०२७ मे    ४३.०    ३०.०२८ मे    ४३.०     ३०.०२९ मे    ४४.०     ३१.०३० मे    ४४.०     ३१.०३१ मे    ४४.०     ३१.० 

टॅग्स :TemperatureतापमानAurangabadऔरंगाबाद