शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत औरंगाबादचा सत्यम भूषवणार महाराष्ट्राचे कर्णधारपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:42 IST

विद्यापीठ परिसरातील साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील अ‍ॅस्ट्रोटर्फवर १७ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू सत्यम निकम हा महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. या स्पर्धेत यजमान महाराष्ट्राची सलामीची लढत उत्तर प्रदेश संघाविरुद्ध रंगणार आहे. हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोरे यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हॉकी संघाची शुक्रवारी घोषणा केली. विशेष म्हणजे औरंगाबादच्याच अमिद खान पठाण याचाही महाराष्ट्राच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देयजमानांची सलामीची लढत होणार उत्तर प्रदेशविरुद्ध

औरंगाबाद : विद्यापीठ परिसरातील साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील अ‍ॅस्ट्रोटर्फवर १७ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू सत्यम निकम हा महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. या स्पर्धेत यजमान महाराष्ट्राची सलामीची लढत उत्तर प्रदेश संघाविरुद्ध रंगणार आहे. हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोरे यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हॉकी संघाची शुक्रवारी घोषणा केली. विशेष म्हणजे औरंगाबादच्याच अमिद खान पठाण याचाही महाराष्ट्राच्या संघात समावेश करण्यात आला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्पर्धेत औरंगाबादच्या सत्यम निकम याने आपला विशेष ठसा उमटवला आहे. पुणे येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतही सत्यम निकम याने महाराष्ट्र संघाचे उपकर्णधारपद भूषवले होते. तसेच गतवर्षी मणीपूर येथे झालेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतही त्याने महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा पार पाडली होती. जाहीर झालेल्या १८ सदस्यीय संघात सातारा, इस्लामपूर व नांदेड येथील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. विविध शहरांतील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी औरंगाबादच्या सत्यम निकम याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आल्याचे हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोरे यांनी सांगितले.यजमान महाराष्ट्राचा क गटात समावेश करण्यात आला असून, त्यांची साखळी फेरीतील लढत गंगपूर-ओडिशा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हॉकी संघाविरुद्ध होणार आहे. महाराष्ट्राची सलामीची लढत उत्तर प्रदेशविरुद्ध १७ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता रंगणार आहे. दरम्यान, साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी महाराष्ट्र संघाची जर्सी सत्यम निकम याला आज एका सोहळ्यात प्रदान केली. यावेळी औरंगाबाद हॉकी संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांची उपस्थिती होती.राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाहीर झालेला महाराष्ट्राचा संघ :सत्यम निकम (कर्णधार), व्यंकटेश केचे (उपकर्णधार), आमिद खान पठाण, रविराज शिंगटे, किरण मोहिते, सूरज कांबळे, महेश पाटील, अथर्व कांबळे, सचिन कोल्हेकर, हर्ष परमार, हरीश शिंगडी, धैर्यशील जाधव, प्रज्वल मोहरकर, श्रीकांत बोडिगम, अमिल कोल्हेकर, मयूर धनवडे, कृष्णा मुसळे, यश अंगीर. प्रशिक्षक : अजित लाक्रा, एडविन मोती जॉन.महाराष्ट्राचे साखळी सामने१७ फेब्रुवारी : उत्तर प्रदेश हॉकी१८ फेब्रुवारी : हॉकी गंगपूर-ओडिशा२0 फेब्रुवारी : दिल्ली हॉकी२१ फेब्रुवारी : हॉकी कर्नाटक