शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आज होणार औरंगाबादच्या ‘समांतर’चा फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:12 IST

समांतर जलवाहिनीच्या कंपनीला काम द्यावे किंवा नाही, याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी सोमवारी सहाव्या वेळेस महापालिका सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही निर्णय घ्या, शासन सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासन गुरुवारी दिले. त्यामुळे महापालिका पदाधिकारी समांतरच्या बाजूने निर्णय घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीने लादलेल्या जाचक अटी शर्ती सर्वसाधारण सभेत किती अमान्य करण्यात येतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देमनपा सर्वसाधारण सभा : एकाच विषयासाठी सहाव्यांदा सभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनीच्या कंपनीला काम द्यावे किंवा नाही, याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी सोमवारी सहाव्या वेळेस महापालिका सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही निर्णय घ्या, शासन सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासन गुरुवारी दिले. त्यामुळे महापालिका पदाधिकारी समांतरच्या बाजूने निर्णय घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीने लादलेल्या जाचक अटी शर्ती सर्वसाधारण सभेत किती अमान्य करण्यात येतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.मागील दोन महिन्यांपासून महापालिकेत समांतर जलवाहिनीच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी शिवसेना समांतरचा ठराव मंजूर करण्यास अनुकूल आहे. भाजपची काहीच हरकत नाही. विरोध फक्त एमआयएमचा सुरू आहे. मागील पाच सर्वसाधारण सभेत समांतरच्या मुद्यावर सभेत चर्चेला सुरुवातच झाली नाही. सोमवारी सकाळी ११.३० वाजता सभेला सुरुवात झाल्यावर सर्व पक्षांचे गटनेते या मुद्यावर भूमिका मांडतील. त्यानंतर नगरसेवक चर्चेत सहभागी होणार आहेत. सभेचे मत आणि पक्षाचा आदेश मिळाल्यावर निर्णय घेण्यात येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.कंपनीने लादलेल्या अटीमनपाने एक महिन्यात पाणीपुरवठा योजना कंपनीकडे हस्तांतरित करावी.करार झाल्यानंतर ४ वर्षे पाणीपट्टीत वाढ होणार नाही. त्यानंतर दरवर्षी १० टक्के वाढ होईल.चार वर्षांनंतर नळांना मीटर बसविण्यात येईल.कंपनीला वर्कआॅर्डर देताच ५० कोटी रुपये जुनी थकबाकी द्यावी.१ हजार कोटींचे कर्ज घेण्यासाठी मनपाने बँक गॅरंटी घ्यावी. मनपाच्या मालमत्ता गहाण ठेवण्याची मुभा द्यावी.१ हजार कोटींच्या प्रकल्पात जीएसटी रक्कम मनपानेच द्यावी.पाणीपट्टीतील दरवाढ न परवडणारीयुटिलिटी कंपनी ३० सप्टेंबर २०२२ नंतर पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के दरवाढ करणार आहे. सध्या ४ हजार ५० रुपये मनपाकडून पाणीपट्टी वसूल करण्यात येते. कंपनी दहा वर्षे पाणीपुरवठा योजना चालविणार आहे. पाणीपट्टीच्या माध्यमातून १०० कोटी रुपये दरवर्षी कंपनी वसूल करणार आहे. योजनेसाठी लागणारी ८० टक्के रक्कम यातून वसूल करणार आहे. याशिवाय मनपा कंपनीला दरवर्षी योजना चालविण्यासाठी स्वतंत्रपणे ६० कोटी रुपये देणार आहे. चारही बाजूने कंपनीचाच फायदा बघितला जात आहे. औरंगाबादकरांना संभाव्य दरवाढ न परवडणारी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिकाwater transportजलवाहतूक