शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादची प्रतिमा कचरा प्रकरणामुळे झाली मलिन; उद्योगविश्वातून प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 13:17 IST

शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात महापालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणेला आलेले अपयश हे या शहराच्या प्रतिमेला हानिकारक असल्याच्या प्रतिक्रिया उद्योग वर्तुळातून उमटल्या आहेत.

औरंगाबाद : शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात महापालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणेला आलेले अपयश हे या शहराच्या प्रतिमेला हानिकारक असल्याच्या प्रतिक्रिया उद्योग वर्तुळातून उमटल्या आहेत. नव्याने गुंतवणूक होण्यावरदेखील या मुद्याचा परिणाम होऊ शकतो, अशीही शक्यता काहींनी वर्तविली.

२१ व्या दिवशीही शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेसह शासनाने नियुक्त केलेल्या विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला काहीही करता आले नाही. देश-विदेशात औरंगाबाद शहराची अस्वच्छ अशी प्रतिमा निर्माण झाली असून, याचे पडसाद वेगवेगळ्या पातळीवर उमटू शकतात, अशी भीती उद्योग वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

२१ दिवसांपासून शहर चर्चेतउद्योजक तथा मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले, कचरा प्रकरणामुळे औरंगाबाद शहर मागील २१ दिवसांपासून चर्चेत राहिले ते के वळ कचर्‍याच्या विल्हेवाटीवरून. त्यामुळे शहराची प्रतिमा अस्वच्छ शहर म्हणून झाली आहे. त्याचे उद्योग, पर्यटनावर थेट परिणाम सध्या दिसत नसले तरी शहराची प्रतिमा मात्र डागळली आहे. 

गुंतवणुकीवर परिणाम होईलनव्याने गुंतवणूक करणारे उद्योग शहराची पर्यावरण साखळीदेखील विचारात घेत आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरात कचर्‍यासारख्या ज्वलनशील प्रश्नावर उपाय शोधण्यात शासकीय आणि राजकीय पातळीवरील यंत्रणांना येणारे अपयश हे निश्चित परिणामकारक आहे. शहराची प्रतिमा डागळली असून, पर्यटनाच्या राजधानीचे जगभर नाक गेले आहे. औद्योगिक वसाहतीतील स्वच्छतेकडे मनपा अजूनही पूर्णपणे लक्ष देऊ शकलेली नाही, असे मत उद्योजक अर्जुन गायके यांनी व्यक्त केले.

उद्योगांकडून बोध घ्यावामनपासह इतर यंत्रणांनी उद्योगांकडून बोध घेतला पाहिजे. सर्व स्तरावर संघर्ष करून उद्योग सुरळीत चालविले जातात. मग पालिका सर्व सुविधा देण्यासाठी सुरळीतपणे का चालविली जात नाही. कचर्‍याच्या प्रश्नामुळे  उद्योगांवर काही परिणाम होईल, असे वाटत नाही; परंतु औद्योगिक वसाहतींच्या स्वच्छतेकडे पालिका पाहिजे तसे लक्ष देत नाही. औद्योगिक वसाहती स्वच्छ ठेवण्यासाठी उद्योजक आपापल्या परीने प्रयत्न करतात. कचर्‍याच्या प्रक्रियेबाबत जगभरातील प्रयोग समजून घेतले पाहिजेत, असे मत मसिआ संघटनेचे अध्यक्ष सुनील किर्दक यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद