शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे खुशी, तनवीर, शुभम, श्रवीन उमटवणार खेलो इंडियात ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:04 IST

पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये औरंगाबादची आंतरराष्ट्रीय खेळाडू खुशी डोंगरे, राष्ट्रीय खेळाडू तनवीरसिंग दरोगा, शुभम गवळी आणि श्रवीन तनवडे यांची महाराष्ट्राच्या बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवणारी खुशी डोंगरे ही खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे, तर राष्ट्रीय खेळाडू शुभम गवळी व तनवीरसिंग दरोगा हे २१ वर्षांखालील आणि श्रवीन तनवडे हा महाराष्ट्राच्या १६ वर्षांखालील संघाकडून आपला ठसा उमटवण्यास आतुर असेल.

औरंगाबाद : पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये औरंगाबादची आंतरराष्ट्रीय खेळाडू खुशी डोंगरे, राष्ट्रीय खेळाडू तनवीरसिंग दरोगा, शुभम गवळी आणि श्रवीन तनवडे यांची महाराष्ट्राच्या बास्केटबॉल संघात निवड झाली आहे.नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवणारी खुशी डोंगरे ही खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे, तर राष्ट्रीय खेळाडू शुभम गवळी व तनवीरसिंग दरोगा हे २१ वर्षांखालील आणि श्रवीन तनवडे हा महाराष्ट्राच्या १६ वर्षांखालील संघाकडून आपला ठसा उमटवण्यास आतुर असेल.खुशी डोंगरेने याआधी १६ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून, तिची १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या शिबिरासाठीही निवड झाली होती. तिने आतापर्यंत ८ राज्यस्तरीय, ४ राष्ट्रीय व एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे तनवीरसिंग दरोगाने २१ वर्षांखालील फेडरेशन कप, १६ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे, तसेच तनवीरसिंग दरोगा आणि शुभम गवळी यांनी पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सुवर्णपदक जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे श्रवीन तनवडेने नवी दिल्ली येथे झालेल्या १९ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. खुशी डोंगरे व शुभम गवळी यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संदीप ढंगारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे, तर तनवीरसिंग दरोगा, श्रवीन तनवडे यांना प्रशिक्षक मनजितसिंग दरोगा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष संजय डोंगरे, महेश भागवत, ज्ञानेश्वर जगताप, अभय सोभावने, सुशांत शेळके, खेमजी पटेल, संदीप सातदिवे, महेश इंगळे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Basketballबास्केटबॉल