शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाला ‘टेक ईट ईझी’ धोरण पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 17:11 IST

शहरातील कचराकोंडीला आज २० दिवस होतील. आतापर्यंत महापालिका प्रशासनाला कचरा प्रश्नावर तोडगा काढता आला नाही.

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीला आज २० दिवस होतील. आतापर्यंत महापालिका प्रशासनाला कचरा प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. शहराच्या आसपास कुठेही कचरा टाकला, तर नागरिक अंगावर येत आहेत. ७ ते ८ हजार मेट्रिक टन कचरा शहरातील विविध रस्त्यांवर साचला आहे. कचर्‍याचा प्रश्न थेट खंडपीठात पोहोचला. मंगळवारी खंडपीठाने नारेगाव येथे कचरा टाकण्यास मनाई केली. त्यामुळे महापालिकेची चारही बाजूंनी आता कोंडी झाली असून, अशा परिस्थितीत प्रशासन करणार काय...? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

सिडको-हडकोसह चिकलठाणा, शिवाजीनगर, गारखेडा, सेव्हन हिल, क्रांतीचौक आदी भागांत कचराकोंडीची दाहकता अत्यंत कमी आहे. कारण या भागातील बहुतांश सर्व वॉर्डांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा होतो. ओल्या कचर्‍यावर ठिकठिकाणी प्रक्रिया करण्यात येते. जुने शहर आणि आसपासच्या परिसरात कचर्‍याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. रस्त्याच्या कडेला अक्षरश: डोंगर साचले आहेत.

मागील तीन ते चार दशकांमध्ये अशी कचराकोंडी औरंगाबादकरांनी कधीच अनुभवली नव्हती.  कचराकोंडीवर मार्ग काढण्यासाठी आतापर्यंत महापालिकेने सर्व लाईफलाईनचा वापर केला आहे. आता एकही लाईफलाईन प्रशासनाकडे शिल्लक राहिलेली नाही. कचर्‍यावर प्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय मनपासमोर आहे. त्यासाठी यंत्रसामग्री लागते. कोट्यवधींची यंत्रसामग्री ‘आणीबाणी’ कायद्यात थेट खरेदी करण्यास आयुक्त नकार देत आहेत. निविदा प्रक्रियेनेच सर्व सोपस्कर पूर्ण करण्यावर त्यांचा भर आहे. निविदा प्रक्रियेला किमान ४५ दिवस लागतील. प्रकल्प उभारणीला दोन महिने किमान लागणार, हे निश्चित. आणखी तीन महिने औरंगाबादकरांना कचराकोंडीचा सामना करावा लागणार का, हा मोठा प्रश्न आहे.

आंदोलकांनी नाक दाबल्यावर...महापालिका प्रशासनाने कचर्‍याच्या प्रश्नावर कधीच गांभीर्य दाखविले नाही. १६ फेब्रुवारीपासून नारेगावच्या आंदोलकांनी नाक दाबल्यावर महापालिकेचे डोके ठिकाणावर आले आहे. नारेगावच्या आंदोलकांनी चार महिन्यांपूर्वीच वॉर्निंग दिली होती, तेव्हा मनपाने आणखी मुदत वाढवून घेऊ असे म्हणत ‘टेक ईट ईझी’चे धोरण स्वीकारले होते. मनपा प्रशासनाच्या याच पद्धतीचे परिणाम शहरातील लाखो नागरिकांना भोगावे लागत आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद