शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांची छोट्या पंढरपुरात गर्दी; विविध भागातून निघाल्या पायी दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 12:32 IST

शहरात आज पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय छोट्या पंढरपूरला जाण्यासाठी अनेक भागांतून पायी दिंडीही निघाल्या आहेत. 

औरंगाबाद : आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध भागांतील विठ्ठल-रुक्मिणीची मंदिरे सजविण्यात आली आहेत. बहुतांश मंदिरांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. यानिमित्ताने आज पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय छोट्या पंढरपूरला जाण्यासाठी अनेक भागांतून पायी दिंडीही निघाल्या आहेत. 

शहरातून तसेच सिडको-हडको, मुकुंदवाडी, चिकलठाणा, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, जवाहर कॉलनी, सारा वैभव आदी भागांतून छोटा पंढरपूर (वाळूज) ला जाण्यासाठी पायी दिंडीला आज सकाळपासूनच सुरुवात झाली. बन्सीलालनगर येथील माहेश्वरी प्रभागतर्फे गिरिजामाता मंदिरापासून सकाळी ७ वाजता दिंडीला प्रारंभ झाला. याशिवाय बेगमपुरा, पदमपुरा, विद्यानगर आदी भागांतूनही जुन्या पारंपरिक दिंडी निघणार आहे. जालना रोड, अदालत रोड, छावणी ते छोटा पंढरपूर या रस्त्यावर काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था, मित्रमंडळांच्या वतीने फराळाची व्यवस्था केली आहे.

विविध ठिकाणी महापूजेचे आयोजन जुन्या व नवीन वसाहतींमध्ये अनेक ठिकाणी विठ्ठल-रुक्मिणीची मंदिरे आहेत. त्यापैकी एक जुने मंदिर औरंगपुऱ्यातील एकनाथ मंदिर होय. येथे विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे. येथील विश्वस्त समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सदानंद देव यांच्या हस्ते पहाटे अभिषेक व पूजा करण्यात येणार आहे. सकाळी ७ वाजता मंदिरातून छोटा पंढरपूरकडे पायी दिंडी काढण्यात येणार आहे. ज्योतीनगरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सिडको एन-६ येथील विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात पहाटे ४ वाजता काकडारती व महापूजा होणार आहे. दुपारी महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. मयूर पार्क येथील विठ्ठल-रुक्मिणी व गणपती मंदिरातही महापूजा, अभिषेक करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीspiritualअध्यात्मिकWalujवाळूज