शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांचे शिर्डीहून मुंबई, दिल्लीचा हवाई प्रवास; नव्या विमान सेवेची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 20:20 IST

जेट एअरवेजचे मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमान महिनाभरापासून बंद आहे.

ठळक मुद्देआता थेट सायंकाळीच एअर इंडिया आणि ट्रू जेटच्या विमानांचे उड्डाण शिर्डीहून दिल्लीला जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणारे जेट एअरवेजचे मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमान महिनाभरापासून बंद आहे. परिणामी, आता थेट सायंकाळीच एअर इंडिया आणि ट्रू जेटच्या विमानांचे उड्डाण होत आहे. परिणामी, सकाळी मुंबई आणि दिल्लीला विमानाने जाऊ इच्छिणारे प्रवासी शिर्डी विमानतळाकडे वळत असल्याने औरंगाबादेत चिंता व्यक्त होत आहे. 

आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने आपली विमान वाहतूक तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जेट एअरवेजची औरंगाबादहून सुरूअसलेली सकाळ आणि सायंकाळची मुंबई- औरंगाबाद- मुंबई विमानसेवा बंद पडली आहे. आजघडीला हैदराबाद- तिरुपती, मुंबई आणि दिल्ली या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. एअर इंडिया, ट्रू जेट या दोन कंपन्यांकडून ही विमानसेवा दिली जात आहे. या कंपन्यांच्या विमानांचे उड्डाण हे दुपारनंतर होते. त्यामुळे सकाळच्या वेळेत आणि तातडीने मुंबई आणि दिल्लीला जाऊ इच्छिणारे प्रवासी अशा परिस्थितीत शिर्डी विमानतळाचा पर्याय अनेक जण निवडत आहेत. औरंगाबादेहून शिर्डी गाठून दिल्ली, मुंबईला जाण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्याप्रमाणेच या दोन शहरांतून औरंगाबादला येणारे प्रवासीही शिर्डीचा पर्याय निवडत आहेत.

एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे जेट एअरवेजचे उड्डाण होत असताना एअर इंडियाचे मुंबई- औरंगाबाद- दिल्ली, दिल्ली- औरंगाबाद- मुंबई मार्गावर  १२२ प्रवासी क्षमतेचे विमान होते. जेट एअरवेज बंद झाल्यानंतर प्रवाशांची मागणी वाढत असल्याने १२२ ऐवजी १६२ आसनक्षमता असलेले विमानाचे उड्डाण होत असल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नव्या विमानसेवेसाठी प्रयत्ननव्या विमानसेवेसाठी पाठपुरावा आणि प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नांना यश येऊन आगामी काही दिवसांत नवीन विमानसेवा सुरू होईल, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी सांगितले.

वाढते प्रमाणशिर्डीहून दिल्लीला जाण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबईला जाण्यासाठीही शिर्डीकडे वळत आहेत; परंतु त्याचे प्रमाण अधिक नाही. मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दी एक्स्पे्रसचा पर्याय वाढत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नव्या विमानसेवेसंदर्भात काही हालचाली होतील, असे औरंगाबाद टुरिझम प्रमोटर्स गिल्डचे अध्यक्ष जसवंतसिंग म्हणाले.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळJet Airwaysजेट एअरवेज