शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांच्या स्वप्नातील ‘स्मार्ट बस’ रस्त्यावर आलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:35 IST

महापालिकेने रविवारी बराच गाजावाजा करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘स्मार्ट बस’चे लोकार्पण केले. सोमवारपासून शहर बस रस्त्यावर धावतील... आपण त्यात बसू, असे स्वप्न औरंगाबादकरांनी रंगविले होते. नागरिकांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे काम महापालिकेने केले. सोमवारी एकही बस शहरातील रस्त्यांवर धावली नाही. मनपाला प्राप्त झालेल्या चारही बस आरटीओ कार्यालयात पासिंगच्या प्रक्रियेत अडकल्या होत्या. त्यामुळे वर्षअखेरपर्यंत बससेवा सुरू होईल किंवा नाही, याची अजिबात शाश्वती नाही.

ठळक मुद्देलोकार्पणानंतर : आरटीओच्या पासिंगमध्ये अडकल्या बस

औरंगाबाद : महापालिकेने रविवारी बराच गाजावाजा करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ‘स्मार्ट बस’चे लोकार्पण केले. सोमवारपासून शहर बस रस्त्यावर धावतील... आपण त्यात बसू, असे स्वप्न औरंगाबादकरांनी रंगविले होते. नागरिकांच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे काम महापालिकेने केले. सोमवारी एकही बस शहरातील रस्त्यांवर धावली नाही. मनपाला प्राप्त झालेल्या चारही बस आरटीओ कार्यालयात पासिंगच्या प्रक्रियेत अडकल्या होत्या. त्यामुळे वर्षअखेरपर्यंत बससेवा सुरू होईल किंवा नाही, याची अजिबात शाश्वती नाही.महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांना बस खरेदीची बरीच घाई झाली होती. टाटा कंपनीकडून ३६ लाख रुपयांमध्ये एक बस खरेदी करण्यात आली. तब्बल १०० बसची आॅर्डर कंपनीला देण्यात आली आहे. कर्नाटकच्या धारवाड येथे बसची बांधणी सुरू आहे. आतापर्यंत मनपाला चार बस प्राप्त झाल्या आहेत. रविवारी महापालिकेने युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहर बसचे लोकार्पण केले. पहिल्या भाग्यवान ग्राहकाला तिकीटही देण्यात आल्याची घोषणा केली. सोमवारी किमान चार बस शहरातील प्रमुख मार्गांवर धावतील, असे औरंगाबादकरांना वाटत होते. कारण मागील आठ दिवसांमध्ये महापालिकेने शहर बसची जोरदार मार्केटिंग केली होती. सोमवारी एकही बस मनपाने रस्त्यावर आणली नाही. कंपनी आणि मनपाचे अधिकारी पासिंगच्या प्रक्रियेत होते. दिवसभरात एकाच बसची पासिंग झाली. बुधवारी उर्वरित बसची पासिंग होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.४३ बस कधी येणार...शहर बस चालविण्याची जबाबदारी एस.टी. महामंडळ पार पाडणार आहे. पहिल्या टप्प्यात ४० ते ४५ बस येतील, असे सांगण्यात आले होते. डिसेंबरअखेपर्यंत मनपाला फक्त ४ बस प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित ४३ बस जानेवारी महिन्यात येतील, असे सांगण्यात येत आहे. एस.टी. महामंडळाने तूर्त ४० बस चालविण्याचे नियोजन केले आहे. उर्वरित ६० बस चालविण्यासाठी महामंडळाला मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करावी लागणार आहे.बसथांबे जशास तसेमहापालिकेने मोठा गाजावाजा करून शहर बसचे लोकार्पण तर केले; परंतु आतापर्यंत मनपाने एकही बसथांबा अद्ययावत केलेला नाही. स्मार्ट सिटीतील बसथांबे अद्ययावत राहतील, अशी घोषणा मनपाकडूनच करण्यात आली होती. बसथांबे कोठे असावेत, याचेही नियोजन मनपाने आजपर्यंत केलेले नाही. त्यासाठी लागणाºया खर्चाकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. फक्त बस खरेदी करून एस.टी. महामंडळाला देण्याचीच घाई मनपाला होती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBus Driverबसचालक