शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सीईओंचा दणका; कामात हलगर्जीपणामुळे कन्नड तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 14:32 IST

Aurangabad Zilla Parishad CEOs strict action जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक या दोन अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील ग्रामीण आरोग्य यंत्रणेत समन्वय नसल्याने त्याचा त्रास रुग्ण व नातेवाईकांना होत आहे

ठळक मुद्देसंपूर्ण आरोग्य यंत्रणेची केली कानउघाडणीवैद्यकीय अधीक्षकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

औरंगाबाद : कन्नडमध्ये संसर्ग वाढत असताना मृत्यूदरही ३ टक्क्यांवर पोहोचला आहे. येथील आरोग्य यंत्रणेच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी शुक्रवारी दुपारी कन्नड गाठले. सुटीच्या दिवशी अचानक दिलेल्या भेटीत ग्रामीण रुग्णालय आणि तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील असमन्वय समोर आला. कामातील दुर्लक्ष आणि हलगर्जीपणाबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. बाळकृष्ण लांजेवार यांचा तत्काळ पदभार काढला. तर कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर यांच्या कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक या दोन अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील ग्रामीण आरोग्य यंत्रणेत समन्वय नसल्याने त्याचा त्रास रुग्ण व नातेवाईकांना होत असल्याचे डाॅ. गोंदावले यांच्यासमोर आल्याने त्यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. बाळकृष्ण लांजेवार यांना तत्काळ पदभार काढून हतनुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. हेमंत गावंडे यांच्याकडे सोपवला. ग्रामीण रुग्णालयाच्या भेटीत वैद्यकीय अधीक्षकांच्या डॉ. दत्ता देगावकरांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली असून, त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून कारवाईची शिफारस करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. गोंदावले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कामात हलगर्जीपणा सहन करणार नाहीकोरोनाचे संकट जिल्ह्यात वाढत असताना प्रत्येकाने दिलेल्या आदेशानुसार शिस्तीत काम करणे अपेक्षित आहे. अशाच सरप्राईज व्हिजिट देऊन कामकाजाची पडताळणी पुढील काळातही केली जाईल. कोरोनाला प्रतिबंध करणे, लसीकरण वाढवणे असंक्रमित गावे संक्रमणापासून वाचवण्याला यंत्रणेची प्राथमिकता असल्याचे सांगत कामात हलगर्जी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.- डॉ. मंगेश गोंदावले, सीईओ.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद