शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

समाजकल्याण विषय समितीचे योजना बदलातच गेले सात महिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 19:27 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विषय समितीने यंदा काही योजनांमध्ये बदल केला असून त्यासंबंधीच्या प्रस्तावाला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विषय समितीने यंदा काही योजनांमध्ये बदल केला असून त्यासंबंधीच्या प्रस्तावाला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून ३१ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत योजनांच्या पूनर्नियोजनाला मान्यता घेतली जाईल. तथापि, यंदाच्या आर्थिक वर्षातील सुमारे सात महिन्यांचा कालावधी केवळ योजना बदलातच गेला. त्यामुळे येणाऱ्या दोन- अडिच महिन्यात वैयक्तिक लाभाच्या योजना मार्गी लावण्यासाठी समाजकल्याण सभापती बेडवाल यांनी कंबर कसली आहे. 

आज शुक्रवारी समाजकल्याण विषय समितीची बैठक झाली. या बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या विषय समितीच्या बैठकीत सोलार वॉटर हिटर, जि.प, समाजकल्याण कार्यालयाचे बळकटीकरण, प्रचार व प्रसिद्धी, योजना राबविण्यासाठी प्रशासकीय खर्च, अनुदानित वसतिगृहांना सोलार वॉटर हिटर पुरविणे, ठिबक सिंचन, दुग्ध व्यवसायासाठी गाय- म्हैशींसाठी अर्थसहाय्य, मागासवर्गीयांच्या वस्तीमध्ये ग्रीन जीम, रेशिम शेतीसाठी अर्थसहाय्य आदी १ कोटी ८७ लाखांच्या योजना रद्द करण्यात आल्या व त्याऐवजी मागासवर्गीय लाभार्थ्यांना झेरॉक्स मशिन, संगणक, मागासवर्गीय वस्त्यांमध्ये ग्रंथालय, शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप, लोखंडी पत्रे, पिको फॉल मशिन व पिठाची गिरणी आदी योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यासंदर्भात समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल म्हणाले की, आगामी लोकसभा- विधानसभेची आचार संहिता लागू होण्यापूर्वी सदरील १ कोटी ८७ लाखांच्या वैयक्तीक लाभाच्या योजना मार्गी लागल्या पाहिजेत, या दिशेने पाऊल उचलले आहे. या सर्व योजनांचे अर्ज तालुकास्तरावर पंचायत समित्यांना सादर करण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या पुनर्नियोजनास मान्यता देण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षात जि.प. उपकरातील २० टक्के निधीतील वैयक्तीक लाभाच्या ईलेक्ट्रीक मोटार, कडबा कटर, मागासवर्गीय वस्त्यांना कचराकुंडी आदी योजना वेळेत राबविण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे सुमारे २ कोटी ४० लाख रुपये अखर्चित राहिले. या दायित्वातून यंदा सदरील योजना राबविल्या जाणार आहेत. 

वादात अडकल्या योजना यासंदर्भात सभापती धनराज बेडवाल यांनी सांगितले की, गेल्या वर्षी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागासवर्गीय मुलींसाठी हवाई सुंदरी प्रशिक्षण, मागासवर्गीय विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी योजनांचा अर्थसंकल्पात समावेश केला होता. दरम्यान, या योजनांचा ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना फायदा होणार नाही म्हणून विषय समितीमध्ये सदस्यांनी या योजनांना विरोध केला होता. सदरील योजनांचे पुनर्नियोजन करण्याचा प्रस्ताव वादात अडकला होता. यामध्ये बराच कालावधी गेला. त्यानंतर सदरील योजना रद्द करण्यात आल्या. 

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदSocialसामाजिकgovernment schemeसरकारी योजना