शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत अकरावी प्रवेशाच्या दहा हजार जागा रिक्त राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 12:06 IST

दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना औरंगाबाद मनपा हद्दीतील महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश घेण्यासाठी अॉनलाईन नोंदणीची मुदत सोमवारी संपली.

ठळक मुद्देअकरावी प्रवेशासाठी नोंदणी झालेले विद्यार्थी आणि उपलब्ध जागांची संख्या पाहता जवळपास १० हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद : दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना औरंगाबाद मनपा हद्दीतील महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश घेण्यासाठी अॉनलाईन नोंदणीची मुदत सोमवारी (दि.२५) संपली. अकरावीच्या प्रवेशासाठी २२ हजार १५ विद्यार्थ्यांनी भाग-१ ची नोंदणी केली, तर भाग-२ नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही १९ हजार १५९ एवढी आहे. शहरातील ११२ महाविद्यालयांमध्ये अनुदानित, विना अनुदानित, कायमविना अनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यीत जागांची संख्या ही २८ हजार ७३५ आहे. यामुळे अकरावी प्रवेशासाठी नोंदणी झालेले विद्यार्थी आणि उपलब्ध जागांची संख्या पाहता जवळपास १० हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

अकरावीतील कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी भाग-१ आणि २ भरणे बंधनकारक होते. यासाठी सोमवारपर्यंत (दि.२५) मुदत देण्यात आली होती. यात औरंगाबाद शहरातील ११२ महाविद्यालयांतील प्रवेशासाठी भाग-१ भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही २२ हजार १५ एवढी असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली. मात्र, याचवेळी भाग-२ भरणे विद्यार्थ्यांना बंधनकारक होते. भाग-२ भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र १९ हजार १५९ एवढी आहे. यामुळे महाविद्यालयातील उपलब्ध जागा आणि नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या पाहता अकरावीच्या दहा हजारांपेक्षा अधिक जागा रिक्तY राहण्याची शक्यता आहे. अकरावीतील प्रवेशाच्या अॉनलाईन नोंदणीला कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नसल्याची माहिती शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांनी दिली.

बायफोकल विषयांसाठी आज १ वाजेपर्यंत प्रवेशअकरावीच्या बायफोकल विषय प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश घेण्याची मुदत २२ जूनपर्यंत होती. मात्र, या कालावधीत काही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नाही, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन ११ वी अॉनलाईन प्रवेशांच्या संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीत अपलोड करण्याचे आवाहन सहायक शिक्षण उपसंचालक मधुकर देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र