शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : माथाडी कामगार वेठबिगार आहेत काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:25 IST

माथाडी कायद्याची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी २५ दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणारे माथाडी कामगार वेठबिगार आहेत काय, असा संतप्त सवाल आज येथे बंधुआ मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी अग्निवेश यांनी उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : माथाडी कायद्याची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी २५ दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणारे माथाडी कामगार वेठबिगार आहेत काय, असा संतप्त सवाल आज येथे बंधुआ मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी अग्निवेश यांनी उपस्थित केला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्याचा आज २५ वा दिवस होता. तरीही आंदोलकांच्या मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाने अद्याप गांभीर्याने पाहिलेले नाही. या बाबीचा स्वामी अग्निवेश यांनी निषेध केला. दुपारी त्यांनी आंदोलकांची भेट घेतली व आपले मनोगत मांडले. यावेळी महाराष्टÑ राज्य हमाल- मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, जनता दलाचे अजमल खान, श्रमिक मुक्ती दलाचे सबेदार मेजर बन, मराठवाडा लेबर युनियनचे देवीदास कीर्तिशाही, छगन गवळी, प्रवीण सरकटे, जगन भोजने आदींची उपस्थिती होती.देशातील ९३ टक्के असंघटित कष्टकऱ्यांना, ज्यांचा राष्टÑीय उत्पन्नात ६५ टक्के वाटा आहे. केंद्र सरकारने विनाविलंब चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा व म्हातारपणासाठी पेन्शन सुरू करण्यात यावी, या मागण्यांवर त्यांनी भर दिला.ठिय्या आंदोलन करणाºया माथाडी कामगारांचे अभिनंदन करून केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री, कामगार मंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मध्यस्थी करण्याचे आश्वासनही स्वामी अग्निवेश यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिले.येत्या १९ मार्चपर्यंत प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर २० मार्चपासून माथाडी कामगार सहकुटुंब बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशारा साथी लोमटे यांनी यावेळी दिला.नया जमाना आयेगा...बंधुआ मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी अग्निवेश यांनी आपले भाषण सुरूकरण्यापूर्वी उपस्थितांना मूठ आवळायला सांगून नंतर घोषणा द्यायला सांगितले.‘कमानेवाला खायेगा, लुटनेवाला जायेगा, नया जमाना आयेगा’ या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर स्वामींनी दणाणून सोडला. उपस्थितांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला.स्वामी अग्निवेश यांनी यावेळी जिल्हा प्रशासनावर प्रश्नांची सरबत्तीच केली. केलेल्या कामाची मजुरी व लेव्ही, माथाडी मंडळात दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत भरलीच पाहिजे, असा जर माथाडी मंडळाचा कायदा असेल तर थकबाकी ठेवणाºया संस्थांचे करारच शिल्लक कसे राहतात?, त्यांना बरखास्त का केले जात नाही?, त्यात कुणाचे संबंध आड येतात का?, या सर्व बाबींच्या चौकशीची मागणी त्यांनी केली.