शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : गुलमंडी, धावणी मोहल्ल्यात व्यापाऱ्यांचा बंद; लच्छू पहिलवानच्या अटकेचा केला निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 17:59 IST

१ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी बुधवारी रात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहिलवानला अटक केली. याच्या निषेधार्त आज गुलमंडी, धावणी मोहल्ला येथे व्यापाऱ्यांनी बंद पाळला. 

औरंगाबाद : ११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी बुधवारी रात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहिलवानला अटक केली. याच्या निषेधार्त आज गुलमंडी, धावणी मोहल्ला येथे व्यापाऱ्यांनी बंद पाळला. 

मागील आठवड्यात झालेल्या दंगलीमागे लच्छू पहिलवान असल्याचा आरोप एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी केला होता. या घटनेनंतर त्याचा या दंगलीशी काही संबंध आहे का, याविषयी पोलीस तपास करीत होते. दंगलीसोबतच तोडफोड आणि जाळपोळीच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. शहरात झालेल्या दंगलप्रकरणी राजेंद्र जंजाळ,  फेरोज खान या दोन नगरसेवकांच्या अटकेनंतर एसआयटीकडून ही मोठी कारवाई ठरली. याच्या निषेधार्त आज गुलमंडी, धावणी मोहल्ल्यात व्यापाऱ्यांनी बंद पाळला.

चार दिवस एसआयटी केले पुरावे गोळा लच्छू पहिलवान दंगलीत सक्रिय होता, असा संशय पोलिसांना होता. चार दिवसांपासून एसआयटी त्याच्याविरोधात पुरावे गोळा करीत होते. दोन दिवसांपासून मात्र तो पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना बुधवारी रात्री तो दिवाणदेवडी येथील त्याच्या एका मित्राच्या घरी येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिली. आयुक्तांच्या आदेशाने एसआयटीतील पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, कर्मचारी मनोज उईके, दादासाहेब झारगड, सचिन संकपाळ, विनोद खरात आणि योगेश तळवंदे यांच्या पथकाने सापळा रचला. तो तेथे येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लच्छूला चोहोबाजूने घेरून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सिटीचौक पोलीस ठाण्यात नेले. त्याला दंगल करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिली.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसGulmandiगुलमंडी