शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड प्रकरणी शिवसेनचे माजी खासदार जयस्वाल यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 14:44 IST

हिंसाचाराच्या घटनेत अटकेतील आरोपींना तत्काळ जामिनावर सोडा अशी मागणी करत क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला. 

ठळक मुद्देशहरात ११ व १२ मेला झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अनेक जणांना ताब्यात घेतलेगांधीनगर येथील दोन आरोपींना तत्काळ जामिनावर सोडा अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार जयस्वाल यांनी केली

औरंगाबाद : हिंसाचाराच्या घटनेत अटकेतील आरोपींना तत्काळ जामिनावर सोडा अशी मागणी करत क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जयस्वाल यांना आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अटक करण्यात आली. 

शहरात ११ व १२ मेला झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अनेक जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी गांधीनगर येथील दोन आरोपी क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये अटक होती. या आरोपींना तत्काळ जामिनावर सोडा अशी मागणी करत शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जयस्वाल रविवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान क्रांती चौक पोलीस स्थानकात आले. तेथील कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना सोडण्यास असमर्थता दर्शवली. यावर जैस्वाल यांनी पोलीस स्थानकात गोंधळ घालत तेथील साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी त्यांच्या विरोधात ३५३, ३३२, ५०४ ,५०६, ४२७ कलमासह शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान त्यांना अटक करण्यात आली. 

पोलीस बंदोबस्त वाढवला माजी खासदार जयस्वाल यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. थोड्याच वेळात त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारkranti chowkक्रांती चौकAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस