शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

औरंगाबाद लोकसभेसाठीचे दोन इच्छुक शांतिगिरी महाराज व भापकर एकाच व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:02 IST

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना शिक्षण, सिंचन, कृषी क्षेत्राची आवड आहे. भापकरी छाप पाडण्याचे काम ते या क्षेत्रात करतील. भापकर हजार पट मोठे व्हावेत. समाजाची व जनता ‘जनार्दना’ची सेवा त्यांच्या हातून व्हावी, अशी स्तुतिसुमने शांतीगिरी महाराज यांनी डॉ. भापकर यांच्याविषयी मराठवाड्यातील स्वयंसेवी संस्थांच्या मेळाव्यात उधळली. महाराजांनी डॉ. भापकरांची सूचक वक्तव्याप्रमाणे केलेली स्तुती खूप काही सांगून गेली. 

ठळक मुद्देभाजप आणि संघाची छाप असलेला हा मेळावा चिकलठाण्यातील कलाग्राम येथे अनुलोम संस्था, सीआयआय, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाजमंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याच्या व्यासपीठावर शांतीगिरी महाराज आणि विभागीय आयुक्त डॉ. भापकर या दोन्ही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या उभयतांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

औरंगाबाद : विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना शिक्षण, सिंचन, कृषी क्षेत्राची आवड आहे. भापकरी छाप पाडण्याचे काम ते या क्षेत्रात करतील. भापकर हजार पट मोठे व्हावेत. समाजाची व जनता ‘जनार्दना’ची सेवा त्यांच्या हातून व्हावी, अशी स्तुतिसुमने शांतीगिरी महाराज यांनी डॉ. भापकर यांच्याविषयी मराठवाड्यातील स्वयंसेवी संस्थांच्या मेळाव्यात उधळली. महाराजांनी डॉ. भापकरांची सूचक वक्तव्याप्रमाणे केलेली स्तुती खूप काही सांगून गेली. 

भाजप आणि संघाची छाप असलेला हा मेळावा चिकलठाण्यातील कलाग्राम येथे अनुलोम संस्था, सीआयआय, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाजमंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या व्यासपीठावर शांतीगिरी महाराज आणि विभागीय आयुक्त डॉ. भापकर या दोन्ही लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या उभयतांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले शांतीगिरी महाराज आणि डॉ. भापकर हे दोघेही एकाच व्यासपीठावर राज्यात सरकारच्या योजना प्रचार-प्रसार करण्याचे काम करणार्‍या संस्थेबरोबर आल्यामुळे दोघांपैकी एक भाजपचा उमेदवार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या महिन्यात शांतीगिरी महाराजांची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन स्नेहभोजन घेतल्यानंतर ते जाहीरपणे एखाद्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येण्याची पहिली घटना आहे, तर काही महिन्यांपासून डॉ. भापकर हे भाजपचे उमदेवार असल्याची चर्चा सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे. डॉ. भापकर आगामी काळात जनतेची सेवा करतील की ‘जनार्दना’ची हे आगामी काळात समोर येईल. मेळाव्यात उद्योजक तथा सीआयआयचे अध्यक्ष ऋषी बागला, धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी एनजीओंना मार्गदर्शन केले. यावेळी विजय उक्कलगावकर, रा.स्वं. संघाचे प्रांत संघचालक अ‍ॅड. गंगाधर पवार, डॉ. प्रदीप देशपांडे, डॉ. शिरीष कुलकर्णी, प्रशांत देशपांडे, उद्योजक श्रीराम नारायण, डॉ. अनंत पंढरे, डॉ. प्रसन्न पाटील आदींची उपस्थिती होती. दिवाकर कुलकर्णी यांनी आभार मानले. मेळाव्यात विभागातील १२० एनजीओंनी सहभाग नोंदविला. 

भापकरांची अशी रणधुमाळीडॉ. भापकरांनी मार्गदर्शन करताना प्रचार रणधुमाळी सुरू केल्याप्रमाणे मराठवाड्यात एक वर्षापूर्वी प्रशासकीय कामांची काय अवस्था होती आणि आता सद्य:स्थिती काय आहे, याचा पाढा वाचला. शांतीगिरी महाराजांच्या स्तुतीला साजेशी उत्तरे देताना ते म्हणाले, सर्वांना एकत्र आणणे महत्त्वाचे आहे. २३ पैकी ११ लाख शौचालये १ वर्षांत बांधली. सचिव असताना मनरेगाची अनेक कामे केली. २२ हजार शेततळे मंजूर केली. २५ हजार शेततेळ मार्चपर्यंत देण्याची तयारी आहे. ४ हजार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी ‘उभारी’ योजना आणली. जायकवाडी भरल्यामुळे रबी, खरिपासाठी ४ पाळ्या पाणी देण्याची संधी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपा