शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद संपूर्ण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर; जिल्हाधिकारी चव्हाण यांचे स्पष्ट मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 12:02 IST

Lockdown in Aurangabad तारीख निश्चितपणे सांगता येणार नाही, पण लॉकडाऊनचा निर्णय होणारच आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचीही लॉकडाऊन करण्याबाबत सूचना पालकमंत्री सुभाष देसाई लवकरच संपूर्ण लॉकडाऊनबाबत घेणार निर्णय

औरंगाबाद : जिल्ह्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केले असून, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनीही तसे संकेत दिले आहेत. दुसरीकडे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दुपारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता, लोकप्रतिनिधींकडून लॉकडाऊनबाबत सूचना आलेली आहे. आरोग्य विभागासह मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. शहरात १०० टक्के लॉकडाऊन लागणार आहे. याचा निर्णय लवकरच होणार आहे. तारीख निश्चितपणे सांगता येणार नाही, पण लॉकडाऊनचा निर्णय होणारच आहे. पालकमंत्री देसाई यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. पालकमंत्री देसाई म्हणाले, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना त्रास होतो. त्यामुळे अंशत: लॉकडाऊन केलेले आहे; परंतु आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पाऊल उचला, अशा सूचना आहेत. नांदेड, परभणी, बीडमध्ये लॉकडाऊन केलेले आहे. औरंगाबादमध्ये रोज दीड हजार रुग्ण सापडत आहेत. रुग्णवाढीचा वेग वाढतो आहे. ४ एप्रिल हा एक टप्पा आरोग्य विभागाने दाखविला आहे. त्यावेळी आताच्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण वाढत गेले, तर ते अडचणीचे ठरू शकेल. त्यासाठी जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा, अशा आरोग्य विभागाच्या सूचना आहेत.

आरोग्याला प्राधान्यलॉकडाऊनमुळे मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रावर आणखी परिणाम होईल, याकडे लक्ष वेधले असता देसाई म्हणाले, प्राधान्य आरोग्याला दिले जाईल. बाकीच्या सगळ्या गोष्टी हव्या आहेत, तत्पूर्वी जनतेचे जीवन सुरक्षित करण्याला पर्याय नाही.

लोकप्रतिनिधींच्या बैठकीत झालेली चर्चा अशी...दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आ. अंबादास दानवे यांनी, आगामी होळी आणि रंगपंचमी गर्दी करून साजरी न करण्याबाबत, तसेच जिल्ह्यात आंदोलने, मोर्चे यावर बंदी घालण्याबाबत सूचना केली. आ. प्रदीप जैस्वाल यांनी, रुग्णालये नसलेल्या आवारातील मेडिकल दुकाने बंद करण्याबाबत सूचना पालकमंत्र्यांकडे केली. आ. सतीश चव्हाण यांनी, जिल्ह्यात कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयात उपलब्ध बेड्‌सची माहिती देण्याबाबत सूचना केली. त्याचप्रमाणे जर लॉकडाऊनचा पर्याय निवडला, तर हातावर पोट असणाऱ्या मजुरांसाठी शिवभोजन थाळीचा पर्याय उपलब्ध ठेवावा, असेही चव्हाण म्हणाले. लोकप्रतिनिधींच्या कोरोनाबाबत आढावा बैठकीत जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या, अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या, विविध रुग्णालयांत उपलब्ध असलेली बेड्‌सची संख्या, लसीकरणाचे आतापर्यंतचे प्रमाण, आयसीयु बेड्‌सची संख्या, कोरोना तपासणी केंद्र, याबाबत पीपीटी सादरीकरणाद्वारे माहिती प्रशासनाने दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद