शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : शिक्षक वेतनाचा पेच कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : वित्त विभागाने परवानगी दिल्यास शिक्षकांची वेतन देयके आॅफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण ...

ठळक मुद्देवेतनातील अडसर : वेतन देयके आॅफलाईन पद्धतीने स्वीकारण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वित्त विभागाने परवानगी दिल्यास शिक्षकांची वेतन देयके आॅफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील, असे आश्वासन शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाºयांना दिले.वेतनाअभावी शिक्षकांची कुचंबणा होऊ नये, यासाठी शालार्थ वेतनप्रणालीची सेवा पूर्ववत होईपर्यंत वेतन देयके ही आॅफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिका-यांनी शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी यांच्याकडे केली होती. शालार्थ वेतनप्रणालीचा विषय हा शालेय शिक्षण उपसचिवांकडे असल्यामुळे पदाधिकाºयांनी त्यांच्याकडे पाठपुरावा केला. सर्व्हर बंद पडल्यामुळे शिक्षकांना येणाºया अडचणी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. तेव्हा चौधरी यांनी सांगितले की, यासंबंधीची फाईल ही वित्त विभागाकडे पाठविण्यात आली आहे.आॅफलाईन पद्धतीने वेतन देयके स्वीकारण्याची परवानगी वित्त विभागाला मागितली आहे. वित्त विभागाने परवानगी दिल्यास एक- दोन दिवसांत शिक्षकांची वेतन देयके आॅफलाईन स्वीकारली जातील, असे चौधरी यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाºयांना सांगितले.शिक्षकांची वेतन देयके ज्या वेतनप्रणालीमधून काढली जातात, त्या शालार्थ वेतनप्रणालीची सेवा गेल्या १० जानेवारीपासून बंद पडल्यामुळे शिक्षकांना वेतनासंबंधीची माहिती भरण्यास अडचणी येत आहेत. यापूर्वी आॅफलाईन पद्धतीने शिक्षकांची वेतन देयके काढली जात होती.त्यानंतर यासाठी आॅनलाईन शालार्थ प्रणाली सुरू करण्यात आली. दर महिन्याला वेतन पथक अधीक्षक कार्यालयामार्फ त वेतनासंबंधीची देयके स्वीकारली जातात. मात्र, गेल्या १० जानेवारीपासून सर्व्हर बंद आहे.विलंबाने वेतन ही नित्याचीच बाबयासंदर्भात प्राथमिक शिक्षक संघाचे राजेश हिवाळे म्हणाले की, आता शालार्थ वेतनप्रणाली बंद पडल्यामुळे शिक्षकांना उशिरा वेतन मिळेल. पण, आतापर्यंत शालार्थ वेतनप्रणालीच्याच माध्यमातून वेतन अदा केले जात होते. तेव्हाही दरमहा उशिरानेच शिक्षकांना वेतन मिळायचे. शिक्षकांना दरमहा १ तारखेलाच वेतन अदा करण्यात यावे, यासाठीही प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे.