शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, ३४६ विद्यार्थ्यांचे महापालिकेने घेतले स्वॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 17:06 IST

पॉझिटिव्ह शिक्षकाचा विद्यार्थ्यांसोबत संपर्क आला नसल्याचा शाळेचा दावा

औरंगाबाद : औरंगपुऱ्यातील प्रशालेत क्रीडा शिक्षकाचा कोरोना तपासणी अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझीटीव्ह आला. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांनी धसका घेतला. त्यामुळे सोबतच्या ५३ शिक्षकांनी बुधवारीच आरोग्य केंद्रात धाव घेवून आरटीपीसीआर तपासणी करून घेतली. 

मंगळवारी पाचवी ते सातवी ४०३ तर बुधवारी ४६३ विद्यार्थी उपस्थित होते. तर पहीती ते दहावीच्या या शाळेत ५४ शिक्षक असून दुपारच्या बॅचला २२ शिक्षक आहेत. गुरुवारी शाळेत आलेल्या ३४६ विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणीसाठी स्वॅब मनपाच्या आरोग्य विभागाने घेतले. तर काही विद्यार्थ्यांनी तपासणी करून घेतली नाही. 

खबरदारी म्हणून गुरुवार आणि शुक्रवार प्रत्यक्ष वर्ग बंद करण्यात आले. तर शनिवारी आणि रविवारी सुटी असून सोमवारी शिक्षण विभाग, मनपच्या आरोग्य विभागाच्या सुचनेप्रमाणे पालकांशी चर्चा करून पुन्हा वर्ग भरवण्यासंदर्भात निर्णय शाळा घेणार आहे.

शिक्षकाचा विद्यार्थ्यांसोबत संपर्क आला नाही दरम्यान, बाधित आढळून आलेले ५७ वर्षीय शिक्षक सोमवारी शाळेत तपासनी न करता आले. त्यानंतर दिलेल्या स्वॅबचा अहवाल मंगळवारी सायंकाळी मिळाला. त्यामुळे शाळेतील ३४६ विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर तपासणीला सामोरे जावे लागले. शिवाय शाळेच्या शिक्षकांनाही तीन दिवसांत दुसऱ्यांदा तपासणी करावी लागली. त्या शिक्षकांनी पुन्हा त्यांनी खाजगी रुग्णालयात फेर तपासणी करून घेतली. त्यातही बुधवारी पुन्हा अहवाल पाॅझिटीव्ह आला. त्यांच्यावर गृह विलगीकरणात उपचार सुरु असून त्यांना लक्षणे नाहीत. ते शिक्षक शाळेतही विद्यार्थ्यांच्या संपर्कात आले नसल्याचा दावा शाळेकडून करण्यात आला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद