शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानच्या पथकाकडून सोमवारी होणार औरंगाबादची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 17:08 IST

शहरात २८०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचर्‍यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. संपूर्ण महापालिका कचरा कोंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाचे पथक सोमवारी शहरात पाहणी दौर्‍यासाठी दाखल होणार आहे.

ठळक मुद्दे२६ ते २७ फेब्रुवारीला केंद्रीय पथक शहरात स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे.मात्र, शहरात अचानक कचरा कोंडी निर्माण झाली आहे. मागील ७ दिवसांपासून मनपाला शहरातील कचरा उचलता आलेला नाही.

औरंगाबाद : शहरात २८०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचर्‍यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. संपूर्ण महापालिका कचरा कोंडी फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाचे पथक सोमवारी शहरात पाहणी दौर्‍यासाठी दाखल होणार आहे. शहराची ही बकाल अवस्था पाहता सर्वेक्षणात महापालिका ‘नापास’होण्याची दाट शक्यता आहे.

२६ ते २७ फेब्रुवारीला केंद्रीय पथक शहरात स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. यंदा स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत ४ हजार गुणांची स्पर्धा आहे. स्पर्धेत देशभरातील सुमारे ४ हजार ४१ शहरे सहभागी होत आहेत. राज्यातील नगर परिषदा, महापालिका मिळून २६५ शहरे स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झाली आहेत. केंद्र शासनाने नेमलेल्या कार्वी नामक एजन्सी यंदा सर्वेक्षणाचे काम करीत आहे. या एजन्सीचे किमान तीन अधिकार्‍यांचे पथक दोन दिवस शहरात स्वच्छतेच्या कामांची व विविध उपक्रमांची पाहणी करणार आहे. मनपाने सर्वेक्षणाशी संबंधित सर्व तयारी केली आहे. कागदोपत्री अहवाल तयार केलेला आहे. मात्र, शहरात अचानक कचरा कोंडी निर्माण झाली आहे. मागील ७ दिवसांपासून मनपाला शहरातील कचरा उचलता आलेला नाही. अनेक वसाहतींमध्ये कचर्‍याचे डोंगर साचले आहेत. 

आज पालकमंत्री कचरा प्रश्नावर तोडगा काढणार आहेत. कचरा कोंडी फुटली नाही तर मनपाच्या सर्वेक्षणावर याचा परिणाम होणार आहे. मागील वर्षी औरंगाबाद शहराचा २९९ वा क्रमांक आला होता. २०१६ मध्ये औरंगाबाद शहर ५६ व्या क्रमांकावर होते. स्वच्छ  सर्वेक्षणातील प्रमुख भाग असलेल्या स्वच्छता अ‍ॅपचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेला तीन वेळा मुदतवाढ मिळाली आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका