शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

औरंगाबाद : रझाकार लाजतील एवढा नीच प्रकार; मारहाण पाहून अंगावर शहारे - सतीश चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 17:46 IST

शहरातील कचरा टाकण्यास विरोध करणा-या मिटमिटा गावातील नागरिकांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केले आहेत.

औरंगाबाद : शहरातील कचरा टाकण्यास विरोध करणा-या मिटमिटा गावातील नागरिकांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केले आहेत. वृद्धापासून ते बालकांपर्यंत प्रत्येकाला घरात घुसून मारहाण केली. घरातील सामानाची पोलिसांनी तोडफोड केली. या गावातील तब्बल १२०० पुरुष पोलिसांच्या भितीने पळून गेले आहेत. हा अत्याचार रझाकारांना लाजवेल एवढ्या नीच पद्धतीचा आहे. या अत्याचाराचा आदेश देणाºया पोलीस अधिका-यांची मस्ती विधीमंडळात उतरविणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मिटमिट्यातील  पोलिसी अत्याचाराची पदाधिका-यांसह पाहणी केल्यानंतर आ. सतीश चव्हाण पत्रकार परिषदेत बोलत होते. मिटमिट्यात परीक्षा देऊन येणाºया दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. दोन्ही विद्यार्थी सध्या कोठडीत आहेत. ही रोजंदारी करणारी कुटुंबे आहेत. या विद्यार्थ्यांसह इतर अटक केलेल्या नागरिकांना पोलीस भेटूनही देत नाहीत. २० वर्षांपासून शहराचे खासदार असलेले चंद्रकांत खैरे हे प्रत्येक योजनेचे श्रेय घेतात. कच-याचे श्रेय मात्र घेत नाहीत. 

भापकरांना उमेदवार व्हायचेय

कच-याची जिम्मेदारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी घेतली असल्याचे वाचनात आले. मात्र या सर्व प्रकारावर महापालिकेचे आयुक्त काय करतात? ही सर्व जिम्मेदारी त्यांची आहे. अपयशही त्यांचे आहे. शहराचे खासदार ठेकदाराशी बंददाराआड चर्चा करतात आणि हे आयुक्त बाहेर दिडतास वाट पाहतात. अशा अधिकाºयांनी स्वाभिमानापोटी पदाचा राजीनामा द्यावा. यात भापकर कच-याची जिम्मेदारी घेतात. त्यांनी मनपात असताना काय दिवे लागले. आता त्यांना कोणत्यातरी पक्षाकडून उमेदवार व्हायचे असल्यामुळे जिम्मेदारी घेत असतील, असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.

खैरेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आम्ही मावळे असून, गनिमा काव्याचा वापर करून शहरातील कचरा बाहेरील गावांमध्ये टाकू, असे खा. खैरे यांनी सांगितले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी काव्याचा वापर शत्रूला पराभूत करण्यासाठी केला होता. शहराबाहेरील गावातील लोक शत्रू आहेत का? त्यांच्याबाबत खैरे असे बोलूच कसे शकतात. हा तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत अपमान केला आहे. याचे परिणामही खा. खैरे यांना भोगावे लागतील,असेही आ. चव्हाण म्हणाले.