शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना मिळाले मानाचे स्थान

By admin | Updated: December 23, 2015 00:06 IST

औरंगाबाद :प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पाहण्याचा मान आपल्या शहरातील खंडेराव हरिभाऊ काळे आणि अक्षय अनंत कोलते या दोन विद्यार्थ्यांना मिळाला आहे.

औरंगाबाद : २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिल्लीला पंतप्रधान कक्षात बसून ‘याचि देही याची डोळा’ प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पाहण्याचा मान आपल्या शहरातील खंडेराव हरिभाऊ काळे आणि अक्षय अनंत कोलते या दोन विद्यार्थ्यांना मिळाला आहे. हा कार्यक्रम एकदा तरी प्रत्यक्ष अनुभवायला मिळावा, असे स्वप्न अनेक भारतवासीय पाहत असतात. दरवर्षी देशातील विविध क्षेत्रातील गुणवंतांना या कार्यक्रमासाठी पाचारण करण्यात येत असते. यंदा या कार्यक्रमासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून देशभरातील विविध राज्यांमधून जवळपास ३०० विद्यार्थ्यांचा बायोडाटा मागवण्यात आला होता. खंडेराव काळे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे. विद्यापीठाच्या सल्लागार समितीमध्ये देखील त्याचा सक्रिय सहभाग आहे. अक्षय कोलते हा औरंगाबादच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिक म्युनिकेशन शाखेच्या अंतिम वर्षाला आहे. पुण्याच्या ‘मैत्री’ या सेवाभावी संस्थेसोबत तो मेळघाटातील आदिवासी लोकांसाठी कार्य करत असतो. तसेच ‘वेस्टपासून बेस्ट’ बनवण्याच्या कार्यातही त्याचा सक्रिय सहभाग आहे. डॉ. बा. आं. म. वि. चे कुलगुरू डॉ. चोपडे, कुलसचिव डॉ. राजेश करपे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख आदींनी या दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.