शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद : सचिवांनी मागविला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:11 IST

सार्वजनिक बांधकाम विभागातील पदोन्नतीच्या प्रस्तावाला खीळ बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पदोन्नतीसाठी बांधकाम विभाग खात्याकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्याने सचिव पातळीवरून खुलासा मागविण्यात आला. ३ मे रोजीच्या अंकात ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची सचिव पातळीवरून दखल घेतली गेली.

ठळक मुद्देपदोन्नती प्रस्तावाची तपासणी होणार : निकषांची पूर्तता असेल तरच पदोन्नती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागातील पदोन्नतीच्या प्रस्तावाला खीळ बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पदोन्नतीसाठी बांधकाम विभाग खात्याकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात त्रुटी असल्याने सचिव पातळीवरून खुलासा मागविण्यात आला. ३ मे रोजीच्या अंकात ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची सचिव पातळीवरून दखल घेतली गेली.सार्वजनिक बांधकाम विभागातील अंदाजे ४० उपअभियंत्यांना कार्यकारी अभियंता या पदावर पदोन्नती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बांधकाम विभागात सेवेत आल्यानंतर पदोन्नतीसाठी उपअभियंत्यांना तीन वर्षांच्या आत व्यावसायिक परीक्षा देऊन ती उत्तीर्ण व्हावे लागते. २००० साली बांधकाम विभागाच्या सेवेत आलेल्या अभियंत्यांना पदोन्नती देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातील अनेकांनी व्यावसायिक परीक्षा दिलेली आहे की नाही, याबाबत विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता भगत यांच्यामार्फत पदोन्नती देण्यात येणाऱ्या अभियंत्यांची यादी अधीक्षक आणि मुख्य अभियंत्यांकडे देण्यात आली आहे.पदोन्नती देण्यात येणारे सर्व अभियंते परीक्षा उत्तीर्ण असल्याचा शेरा भगत यांनी मारला. व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण नसताना ती परीक्षा उत्तीर्ण असल्याचा लेखी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. सचिवांनी स्पष्टीकरण मागविल्यामुळे तत्कालीन मुख्य अभियंता एम.एम. सुरकुटवार, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी या प्रकरणात फारसे लक्ष घातले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.२००० सालची बॅच संपल्यानंतर २००२ व त्यानंतर पुढील वर्षांतील उपअभियंत्यांचा पदोन्नतीसाठी नंबर लागेल. मागील १० ते १५ वर्षांपासून जे उपअभियंते व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यातील अनेक जण पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत.सचिवांनी दिले तपासणीचे आदेशबांधकाम विभाग सचिवांनी अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क करून या प्रकरणात नेमके काय घडले, ते तपासण्याचे आदेश दिले. त्यानुसार कार्यकारी अभियंता भगत यांनी वरिष्ठ पातळीवर खुलासा पाठविल्याची माहिती आहे. कशाच्या आधारे प्रस्ताव दिले, कुणी-कुणी प्रस्ताव तपासले. शहानिशा न करता शासनाकडे प्रस्ताव कसे गेले. ही बाब वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने घेतल्यास या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याचे संकेत आहेत, तसेच मुख्य व अधीक्षक अभियंत्यांनी या प्रकरणात फारसे लक्ष दिलेले नसल्याचे दिसते. राज्य पातळीवरून आलेले सर्व पदोन्नतीचे प्रस्ताव आता तपासूनच पुढे जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागAurangabadऔरंगाबाद