शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात; लोकप्रतिनिधींचे तेच सल्ले अन्‌ प्रशासनाची तीच उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 16:07 IST

खाजगी रुग्णालयाकडून आकारण्यात येणारे बेहिशेबी बिल, डॉक्टर्स उपलब्ध न होणे, ऑक्सिजन सुविधेत वाढ करणे, इंजेक्शन, व्हेंटिलेटर बेड्स देण्याकडे लोकप्रतिनिधींनी सोमवारच्या बैठकीत लक्ष वेधले.

ठळक मुद्देदहा महिन्यांपासून खाटा, इंजेक्शनावरच काथ्याकूट

औरंगाबाद : कोरोना संसर्ग नियंत्रण उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय लोकप्रतिनिधींमध्ये मागील दहा महिन्यांपासून दर सोमवारी बैठका होत असून, खाटा, रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन उपलब्धतेसाठी काथ्याकूट सुरू आहे. लोकप्रतिनिधींनी वारंवार बैठकीत याच मुद्द्यावर सल्ले दिले, तर प्रशासनानेदेखील सोयीनुसारच उत्तरे देण्याची परंपरा कायम राखली आहे.

खाजगी रुग्णालयाकडून आकारण्यात येणारे बेहिशेबी बिल, डॉक्टर्स उपलब्ध न होणे, ऑक्सिजन सुविधेत वाढ करणे, इंजेक्शन, व्हेंटिलेटर बेड्स देण्याकडे लोकप्रतिनिधींनी सोमवारच्या बैठकीत लक्ष वेधले. दहा महिन्यांपासून याच मागण्यांचा पाढा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बैठकीत वाचला जात आहे. त्यावर जास्त बिल आकारणाऱ्या हॉस्पिटल्सची लेखापरीक्षकांमार्फत तपासणी केली जात आहे. अतिरिक्त रक्कम रुग्णास परत करण्याचे आदेश दिले असून, ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या लोकप्रतिनिधींसोबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह खा. डॉ. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, जि. प. अध्यक्षा मीना शेळके, आ. अंबादास दानवे, आ. सतीष चव्हाण, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंह राजपूत, आ. प्रदीप जैस्वाल, आ. हरिभाऊ बागडे, मनपा प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. नीता पाडळकर, डॉ. सुधाकर शेळके, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी, आयुक्तांचा दावा असाजिल्ह्यात सध्या ३४९ रुग्णवाहिका असून, १९२ उपचार सुविधांमध्ये २०,५७२ खाटा उपलब्ध आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन खाटा २५०८, तर आयसीयू खाटा ७६० आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर १.५७ असून, आता सीएसआर फंडातूनही व्हेंटिलेटर प्राप्त झाल्याचा दावा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केला. दुसरीकडे, मनपा आयुक्त पाण्डेय यांनी मेल्ट्रॉनमध्ये ऑक्सिजन व्यवस्था वाढविण्यात येत असून, पुरेशा प्रमाणात उपचार सुविधा सज्ज ठेवण्यात येत असल्याचा दावा केला.

लोकप्रतिनिधींचे सल्ले, सूचना अशाखासगी डॉक्टरांनी रेमडेसिविर इंजेक्शनची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली पाहिजे. अनेक डॉक्टर हे रुग्णांच्या नातेवाइकांना प्रिस्क्रिप्शनमध्ये रेमडिसिविर लिहून देत आहेत. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याचा सल्ला खा. डॉ. कराड यांनी दिला. आ. सावे यांनी सिपेटमध्ये ऑक्सिजन सुविधेत वाढ करण्याचे सुचविले. आ. शिरसाट यांनी मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे उपचारांची सुविधा असून, तिथे उपचार केंद्र सुरू करण्याचे सुचविले. आ. बागडे यांनी खासगी रुग्णालयांनी ऑक्सिजन निर्मिती सुरू करण्यासाठी आदेश देण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या