शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादची दंगल पूर्वनियोजित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 04:06 IST

शहरातील नवाबपुरा, राजाबाजार परिसरात उसळलेली दंगल पूर्वनियोजित असावी, या तर्कास पुष्टी देणारे पुरावे घटनास्थळी सापडले आहेत.

औरंगाबाद : शहरातील नवाबपुरा, राजाबाजार परिसरात उसळलेली दंगल पूर्वनियोजित असावी, या तर्कास पुष्टी देणारे पुरावे घटनास्थळी सापडले आहेत. दंगलखोरांनी बाहुबली चित्रपटात वापरलेल्या गुलेरसारखा गावठी शस्त्राचा वापर दंगलीत केला. इमारतीवर साठवलेले दगडगोटे, पेट्रोल बॉम्बसाठी लागणाऱ्या वाती आणि मिरची पूडचा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे.जुन्या शहराला वेठीला धरणाºया जातीय दंगलीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दंगलीत पेट्रोलबॉम्ब, दगडगोटे मारण्यासाठी बाहुबली, पद्मावत चित्रपटात दाखविलेल्या गुलेरचा वापर करण्यात आला. रस्त्यावरील दोन खांबांना मोठे रबर बांधून, त्याच्या मध्यभागात पोतडे ठेवले होते. या पोतड््यात फेकण्यात येणारे साहित्य ठेवण्यात येत होते. या पोतड्याला पाठीमागे ताणून धरल्यानंतर त्यातील दगडगोटे, गोट्यासह इतर साहित्य दूरवर फेकले जात असल्याचे दिसून आले. नवाबपुरा ते राजाबाजार रस्त्यावर गोट्यांचा खच पडल्याचे दिसून आले. गोफणीतून या गोट्यांचा मारा केला जात होता. नवाबपुरा चौकातील चार मजली इमारतीच्या गच्चीवर पोलिसांना दगडांचा साठा आढळून आला आहे. या ठिकाणावरून दगड मारण्यात येत होते. इमारतीच्या टेरेसवरील दगडगोट्यांची कल्पना नसल्याचे इमारतीचे मालक अब्दुल समद यांनी ‘लोकमत’ला सांगितले.