शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या खाजगी शाळांचे शिक्षक अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:07 IST

खाजगी शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे आॅनलाईन समायोजन करण्यात आले. या घटनेला आता तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असून, ज्या शाळांमध्ये समायोजन झाले, तेथे शिक्षकांना रूजू करून घेण्यास मुख्याध्यापकांनी नकार दर्शविला. परिणामी, सध्या चार प्राथमिक शिक्षक हे त्यांच्या मूळ आस्थापनेवरही नाहीत आणि समायोजन झालेल्या आस्थापनेवरही नाहीत.

ठळक मुद्देआॅनलाईन समायोजन : रुजू करून घेण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खाजगी शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे आॅनलाईन समायोजन करण्यात आले. या घटनेला आता तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असून, ज्या शाळांमध्ये समायोजन झाले, तेथे शिक्षकांना रूजू करून घेण्यास मुख्याध्यापकांनी नकार दर्शविला. परिणामी, सध्या चार प्राथमिक शिक्षक हे त्यांच्या मूळ आस्थापनेवरही नाहीत आणि समायोजन झालेल्या आस्थापनेवरही नाहीत.झाले असे की, ९ आॅक्टोबर रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयाने शहरातील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी शाळांमध्ये समायोजन केले. समायोजनाची ही प्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन राबविण्यात आली. शाळांच्या ‘यू डायस कोड’नुसार समायोजनानंतर या शिक्षकांची नोंद नवीन शाळेत दर्शविली असून, त्यांचा आता मूळ आस्थापनेवरचा दावा संपुष्टात आला आहे. तथापि, समायोजनानंतर एस. आर. कायंदे हे शिक्षक हडको एन- ९ परिसरातील सोनामाता विद्यालयात, व्ही. के. पवार हे मराठा प्राथमिक शाळेत, एस. ए. देसले हे अनंत भालेराव विद्यामंदिरमध्ये, तर वनिता पाठक या जिजामाता प्राथमिक शाळेत रुजू होण्यासाठी गेल्या; पण संबंधित मुख्याध्यापकांनी संस्थाचालकांच्या निर्देशानुसार सदरील शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दर्शविला.यासंदर्भात सदरील चारही शिक्षकांनी मागील तीन महिन्यांपासून शिक्षण विभागात जाऊन आपबिती कथन केली. परंतु त्यांची दखल घेण्यास शिक्षण विभागाचा एकही अधिकारी पुढे आलेला नाही. या चारही शिक्षकांनी आता उपोषणाचा इशारा दिला आहे. समायोजनानंतर या शिक्षकांचे वेतन नवीन शाळेतून निघणे क्रमप्राप्त आहे. परंतु मागील तीन महिन्यांपासून या चारही शिक्षकांना समायोजनाच्या ठिकाणी रुजू करून न घेतल्यामुळे ते वेतनापासूनही वंचित राहिले आहेत. कुटुंबाची होणारी उपासमार लक्षात घेता, आमच्या संबंधी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.शिक्षणाधिकारी रजेवरया चारही शिक्षकांनी आजपासून (१५ जानेवारीपासून) उपोषण सुरू केले होते. परंतु, त्यांना शिक्षण विभागाकडून आश्वासन मिळाल्यामुळे सायंकाळी त्यांनी उपोषण मागे घेतले.यासंदर्भात शिक्षणाधिकाºयांच्या सहकारी कनिष्ठ अधिकाºयांशी चर्चा केली असता ते म्हणाले की, सदरील शिक्षकांना रुजू करून घेण्याविषयी आम्ही मुख्याध्यापकांना पत्र दिले. शाळेत जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चाही केली; पण संस्थाचालकांच्या आदेशान्वये आम्ही शिक्षकांना रुजू करून घेण्यास असमर्थ आहोत, असे उत्तर मिळाले. शिक्षणाधिकाºयांच्या आदेशान्वये सदरील शाळांचे वेतनेतर अनुदान अथवा मुख्याध्यापकांचे वेतन रोखण्याची कारवाई करण्यात येऊ शकते.