शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद पोलीस ठाण्यात नाही सचिन अंदुरेची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:00 IST

अटकेनंतर नेले मुंबईला; प्रतिक्रिया देण्यास पोलीस आयुक्तांचा नकार

औरंगाबाद : सचिन अंदुरेचे घर सिटीचौक ठाण्याच्या हद्दीत, तर त्याच्या कामाचे ठिकाण क्रांतीचौक ठाण्याच्या हद्दीत आहे. त्याला १४ आॅगस्टला एटीएसने ताब्यात घेताना क्रांतीचौक ठाण्यात बोलावले होते. सीबीआयने मात्र त्याला १६ आॅगस्टला उचलल्यानंतर थेट मुंबईला नेले. त्याची नोंद मात्र त्यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात केली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सचिनच्या अटकेसंदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.सचिन समजून आधी दुसऱ्यालाच उचलले१४ आॅगस्टला सचिनच्या अटकेसाठी आलेल्या मुंबई एटीएसच्या अधिकाºयांनी सचिनच्या दुकान मालकाचा मुलगा दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर एका हॉटेलवरील मुलाला हाच सचिन का, असे विचारले. त्याने हो म्हटले आणि अधिकाºयांनी दुकान मालकाच्या मुलालाच बळजबरीने त्यांच्या गाडीत कोंबले. मात्र, चूक लक्षात येताच एटीएसने त्याला पुन्हा दुकानासमोर सोडले. सचिन १० वर्षांपासून अकाऊंटंट म्हणून काम करतो. त्याला दरमहा पंधरा हजार रुपये महिना मिळतो, शिवाय तो अन्य काही लोकांचीही अकाऊंटची कामे करतो. त्यामुळे त्याला अतिरिक्त मोबदला मिळतो. सचिन कधीच रजा घेत नव्हता आणि दांडी मारत नव्हता. तो धार्मिक आणि कडवा हिंदुत्ववादी आहे. त्याच्यावर संशय येईल, अशी त्याची वर्तणूक आढळली नाही. त्याला कशाच्या आधारे सीबीआयने अटक केली, असा सवाल दुकान मालक दिलीप साबू यांनी केला.सचिनचे कुटुंबीय तीन पिढ्यांपासून औरंगाबादेतसचिनचे कुटुंब तीन पिढ्यांपासून औरंगाबादेतील धावणी मोहल्ला येथे भाड्याने राहतात. त्याचे वडीलसुद्धा मुनीम म्हणून काम करीत. सचिनचे बालवाडी ते पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण शहरातच झाले. सचिनचा आंतरजातीय प्रेमविवाह दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने झाल्याचे त्याचे सासरे सूर्यकांत सुरळे यांनी सांगितले. एटीएसने ज्ञानेश्वरनगर भागातील एका बंगल्यामध्ये सनातनच्या कार्यकर्त्याच्या वास्तव्याप्रकरणी माहिती घेतल्याचे समजते.चौकशी करतो म्हणून नेले : शीतल अंदुरे१४ आॅगस्टला एटीएसच्या अधिकाºयांनी औरंगाबादेत येऊन सचिनला ताब्यात घेतले. दोन ते अडीच तास आमच्या घराची झडती घेतली. घरातील कागदपत्रे, बँक खात्याचे पासबुक आदी कागदपत्रे जप्त करून एटीएसने सचिनला मुंबईला नेले होते. त्यांचा मोठा भाऊ प्रवीणही त्यांच्यासोबत गेला होता. तेथे दोन दिवस चौकशी केल्यानंतर सचिनला औरंगपुºयातील सासुरवाडीत आणून सोडले. सचिनची चौकशी पूर्ण झाली, त्याला आम्ही आणून सोडले, असे सांगून अधिकारी तेथून निघून गेले.त्यानंतर अर्ध्या तासाने सीबीआयचे एम.एस. पाटील आणि अन्य अधिकारी आले आणि त्यांनी सचिनला चौकशीसाठी मुंबईला नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर अटक केल्याचीच बातमी टीव्हीवर पाहिली, असे सचिनची पत्नी शीतल अंदुरे यांनी सांगितले.त्यानंतर सचिनला फोन केला तेव्हा त्यांनी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. सीबीआयला २० आॅगस्टपूर्वी अटक दाखवायची होती, असा आरोप शीतल यांनी केला.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरAurangabadऔरंगाबाद