शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत पेट्रोल @ ८३, डिझेल ७0 रुपये 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 18:23 IST

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचा उच्चांक रविवारी नोंदविला गेला.

औरंगाबाद : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचा उच्चांक रविवारी नोंदविला गेला. पेट्रोल ८२.६६ पैैसे तर डिझेल ६९.८७ पैैसे प्रतिलिटरपर्यंत जाऊन पोहोचले आहे. वाढत्या उन्हासोबतच महागाईचे चटकेही शहरवासीयांना सोसावे लागणार आहेत. 

मागील वर्षभरात पेट्रोलच्या भावात लिटरमागे १० रुपये, तर डिझेलच्या भावात ९ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मागील एका दिवसात पेट्रोल २६ पैैसे तर डिझेल २७ पैशांनी महागले. पॉवर पेट्रोल तर ८५ रुपयांच्या जवळपास जाऊन पोहोचले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या दराचा आढावा घेतात. सुरुवातीला काही दिवस भाव कमी झाले; पण त्यानंतर सतत भाव वाढतच आहेत. पेट्रोलपंपचालकांनी सांगितले की, १४ सप्टेंबर २०१४ नंतर पेट्रोलच्या दराने गाठलेला हा मोठा उच्चांक आहे. चार वर्षांपूर्वी शहरात पेट्रोलचे दर ७८ रुपये प्रतिलिटर होते.  या दरवाढीमुळे पुन्हा एकदा नव्याने महागाई उसळणार आहे. मालवाहतूकदार वाहतूकभाड्यात वाढ करण्याचा विचार करीत आहेत. 

दिल्ली-मुंबईच्या तुलनेत औरंगाबाद महाग दिल्ली-मुंबई शहर महागडे म्हणून ओळखले जाते; पण पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत या महानगरांपेक्षा अन्य शहर महाग आहेत. त्यात औरंगाबादचाही समावेश आहे. रविवारी उच्चांक गाठून दिल्लीत पेट्रोल ७४ रुपये, तर डिझेल ६५ रुपये व मुंबईत पेट्रोल ८१ रुपये, तर डिझेल ६८ रुपये प्रतिलिटर विकत होते. औरंगाबादेत मात्र, पेट्रोल ८२ रुपये ६६ पैैसे, तर डिझेल ६९.८७ रुपये प्रतिलिटर विकण्यात आले.

२० टक्क्यांनी मालवाहतूक भाडे वाढणार जीएसटीमध्ये पेट्रोल-डिझेलचा समावेश होणार होता तो झाला नाही. एप्रिलपासून दर कमी होतील अशी अपेक्षा होती; पण झाले उलटेच. डिझेलचे भाव पहिल्यांदाच ७० रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. यामुळे मालवाहतुकीचे दर २० टक्क्यांपर्यंत वाढतील. -फय्याज खान, अध्यक्ष, मालवाहतूकदार संघटना

उद्योगाला बसणार फटका डिझेल भाववाढीचा फटका उद्योगांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. मालवाहतूक खर्चात वाढ होते. यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. त्यात लहान उद्योजकांना याचा सर्वाधिक फटका बसतो. कारण, पेट्रोलियम प्रॉडक्टचेही भाव वाढून जातात. उत्पादन खर्च वाढतो व मालवाहतूक खर्चही वाढतो. मोठे उद्योजक जॉबच्या किमती लवकर वाढवून देत नाहीत. यामुळे लहान उद्योजकांना तारेवरची कसरत करावी लागते. -प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, सीएमआयए 

पेट्रोल-डिझेल जीएसटींतर्गत आणावेपेट्रोल-डिझेलच्या भावाने उच्चांक गाठला आहे. ८० टक्के मालवाहतूकही मालट्रकने केली जाते. परिणामी, मालवाहतुकीचे भाडे वाढेल. हेच महागाई बोकळण्याचे प्रमुख कारण ठरणार आहे. जीवनावश्यक वस्तू महागतील व अंतिम फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसेल. यासंदर्भात आम्ही संघटनेच्या वतीने जीएसटी कौन्सिलला पत्र लिहिणार आहोत. त्यात पेट्रोल-डिझेल जीएसटींतर्गत आणावे, अशी मागणी केली जाणार आहे. -प्रफुल्ल मालाणी, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्स

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपMONEYपैसा