शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत महिला लोकशाही दिनी सहा महिन्यांत आली फक्त एक तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:23 IST

महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते.

ठळक मुद्देमहिला व बालविकास विभागातर्फे दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. 

औरंगाबाद : महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. या महिला लोकशाही दिनात मागील सहा महिन्यांत  केवळ एकच महिला तक्रार दाखल करण्यासाठी  आली. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक शोषण किंवा यासारख्या इतर अन्यायांविरुद्ध महिलांना दाद मागता यावी, यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. 

स. ११ ते १२ हा एक तासाचा वेळ यासाठी निश्चित असतो. जिल्हाधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी या दिनाचे कामकाज बघतात. दि. १८ जून रोजी महिला लोकशाही दिन पार पडला; मात्र यावेळीही अधिकाऱ्यांव्यतिरिक्त एकही तक्रारदार महिला आलेली नव्हती. येथे महिलांनी मोकळेपणाने तक्रार मांडावी आणि महिला व बालविकास विभागाने पाठपुरावा करून तक्रारकर्त्या महिलेच्या अडचणी दूर कराव्यात किंवा संबंधित विभागांना तशा सूचना द्याव्यात, असे अपेक्षित आहे; मात्र  महिलांना असा लोकशाही दिन असतो, हेच माहीत नाही. २०१८ मध्ये केवळ फेब्रुवारी महिन्यात एक महिला तक्रार घेऊन आली होती. यानंतर मात्र कोणतीही महिला या विभागाकडे फिरकलेली नाही. 

अनेक महिला तालुका स्तरावर असणारा महिला लोकशाही दिन, महिला समुपदेशन केंद्र यासारख्या पर्यायी व्यवस्थांकडे दाद मागण्यासाठी जातात किंवा जेथे त्यांच्यावर अन्याय होतो, त्या कार्यालयात दाद मागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या दिनाला प्रतिसाद कमी मिळतो.  या दिनाचा प्रचार व प्रसार करण्यात विभाग कुठेही कमी पडला नसून विभागातर्फे अंगणवाडी सेविका, एनजीओ, बचत गट या माध्यमातून महिला लोकशाही दिनाचा प्रचार व प्रसार केला जातो, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तृप्ती ढेरे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :WomenमहिलाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादwomen and child developmentमहिला आणि बालविकास