शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

औरंगाबाद महापालिकेचे टँकर संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:22 IST

शहरातील ११० पेक्षा अधिक वसाहतींमधील सुमारे ३ लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येते. महापालिकेने टँकर कंत्राटदाराला मागील चार महिन्यांपासून बिल न दिल्याने त्यांनी अनेकदा प्रशासनाला तोंडी, लेखी सूचना केली. प्रशासनाने त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. शुक्रवारी कंत्राटदाराने संपाचे हत्यार उपसले.

ठळक मुद्देनवीन संकट : चार महिन्यांपासून बिल थकल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील ११० पेक्षा अधिक वसाहतींमधील सुमारे ३ लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येते. महापालिकेने टँकर कंत्राटदाराला मागील चार महिन्यांपासून बिल न दिल्याने त्यांनी अनेकदा प्रशासनाला तोंडी, लेखी सूचना केली. प्रशासनाने त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. शुक्रवारी कंत्राटदाराने संपाचे हत्यार उपसले. शुक्रवारी ज्या वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करायचा होता, त्यांना पाणी देता आले नाही. महापालिकेने पर्यायी व्यवस्थाही न केल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.महापालिका अगोदरच कचरा प्रशासनात बरीच संकटात सापडली आहे. दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर तळ्यातमळ्यात सुरू आहे. वारंवार जलवाहिन्या फुटत असल्याने पाणीपुरवठा विभागाची अधिक गोची झाली आहे. त्यातच शुक्रवारी अचानक टँकरचालकाने संप पुकारला. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली. महापालिकेने ज्या वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत, त्या वसाहती मागील अनेक वर्षांपासून टँकरवर अवलंबून आहेत. महापालिका नागरिकांकडून अगोदरच पैसे भरून घेते. एक दिवसाआड टँकरद्वारे दोन ड्रम प्रत्येकाला पाणी देण्यात येते. सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवरून १८ टँकर चालविण्यात येतात. एक टँकर दररोज पाच ट्रीप पाणीपुरवठा करीत असतो. एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर ३४ टँकर आहेत. येथील टँकर दिवसभरात १७० ट्रीप पाणीपुरवठा करतात. कोटला कॉलनी येथून सुमारे १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. सातारा-देवळाई भागातही नागरिकांची तहान भागविण्यासाठी याच कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. शुक्रवारी टँकरचा पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांनी एन-७ आणि एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. कंत्राटदाराने संप पुकारल्याची माहिती नागरिकांना मनपा प्रशासनाकडून देण्यात आली. आम्ही अ‍ॅडव्हान्स पैसे भरले आहेत. महापालिकेने पर्यायी व्यवस्था करून पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावली.या वसाहती टँकरवरहर्सूल, गारखेडा, विजयनगर, पडेगाव, मिटमिटा, जयभवानीनगर, संघर्षनगर, नक्षत्रवाडी, सातारा-देवळाई आदी भागांतील वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.

टॅग्स :water transportजलवाहतूकAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका