शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

औरंगाबाद मनपा प्रशासनाचा करवाढीचा प्रस्ताव रद्द; स्थायी समितीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 14:04 IST

ज्या मालमत्तांना कर लावला आहे, त्यांच्याकडून प्रशासन वसुलीच करीत नाही. प्रशासनाने वसुलीचा आलेख वाढवा, अशी सूचना देऊन सभापती गजानन बारवाल यांनी करवाढीचा प्रस्ताव रद्द केला.

ठळक मुद्देशहरातील नवीन मालमत्तांना कर लावताना २५ टक्केदरवाढ करावी, असा प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केलाबुधवारी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला.

औरंगाबाद : शहरातील नवीन मालमत्तांना कर लावताना २५ टक्केदरवाढ करावी, असा प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केला होता. बुधवारी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला. प्रामाणिकपणे नवीन मालमत्तांना कर लावून घेणार्‍या नागरिकांवर हा अनावश्यक बोजा आहे. ज्या मालमत्तांना कर लावला आहे, त्यांच्याकडून प्रशासन वसुलीच करीत नाही. प्रशासनाने वसुलीचा आलेख वाढवा, अशी सूचना देऊन सभापती गजानन बारवाल यांनी करवाढीचा प्रस्ताव रद्द केला.

२० फेब्रुवारीपूर्वी महापालिका प्रशासनाला मालमत्ता कराचे दर निश्चित करावे लागतात. त्यामुळे यंदा प्रशासनाने ज्या मालमत्तांना कर लावला आहे, त्यांच्याऐवजी नवीन मालमत्तांना कर लावताना २५ टक्के दरवाढ करावी, असा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला विरोध होणार हेसुद्धा प्रशासनाला अपेक्षित होते. बुधवारी सकाळी स्थायी समितीची बैठक सुरू होताच नगरसेवक राजू वैद्य, राज वानखेडे, राखी देसरडा, मनीषा मुंढे, सीताराम सुरे, साजेदा फारुकी यांनी करवाढीच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला.

मालमत्ता कराची वसुली का होत नाही, नवीन मालमत्तांना कर लावण्यात दिरंगाई का होते, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. करमूल्य निर्धारण अधिकारी वसंत निकम यांनी खुलासा केला की, सातारा-देवळाईसह सहा हजार नवीन मालमत्तांना कर लावला आहे. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मनपाचे कायमस्वरुपी फक्त ३५ कर्मचारी आहेत. ६८ सफाई मजुरांच्या मदतीने आणि आऊटसोर्सिंगच्या १३५ कर्मचार्‍यांकडून वसुली सुरू आहे. २३८ कर्मचारी वसुलीचे काम करीत आहेत. वॉर्डांमध्ये कॅम्प लावणे, रिक्षा फिरविणे आदी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

शासनाकडून अडथळेजीआयएस मॅपिंग पद्धतीद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी निविदा काढल्या, पण ते काम पूर्ण होऊ शकले नाही. सर्वसाधारण सभेने १०० आऊटसोर्सिंगचे कर्मचारी नेमून वसुली करावी, असे आदेश दिले. त्यानुसार काम सुरू आहे. वसुली होत नसल्याने व्याज माफीचा ठराव सर्वसाधारण सभेने घेतला. यामुळे महापालिकेचे नुकसान होत होते. प्रशासनाने तो ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवून दिला. यानंतर शासनाने जीआयएस मॅपिंगसाठी स्वत: एजन्सी नेमणार असल्याचे कळविले. नोव्हेंबर २०१७ मध्ये व्याजासह सक्तीने वसुली करा, असा अध्यादेश काढल्याची माहिती वसंत निकम यांनी सभागृहाला दिली.

पाणीपट्टी वसुली करणारनगरसेवकांनी मालमत्ता कराचा आढावा घेतला. आतापर्यंत फक्त ६० कोटी रुपये वसूल झाले. मार्चपर्यंत आणखी वसुली होईल. पाणीपट्टी वसुली फक्त ११ कोटी झाली आहे. मालमत्ता करासोबतच पाणीपट्टीही वसूल करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद