शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कच-यातून काढले औरंगाबाद महानगरपालिकेने अंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:13 IST

शहरातील कचरा कोंडीचा मुद्या राज्य पातळीवर गाजायला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस सरकारने लगेचच हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यानंतर हळूहळू मनपा प्रशासनाने या प्रकरणातून अंग काढून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक : मनपा आयुक्त बदलीच्या प्रयत्नात

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा कोंडीचा मुद्या राज्य पातळीवर गाजायला सुरुवात होताच देवेंद्र फडणवीस सरकारने लगेचच हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यानंतर हळूहळू मनपा प्रशासनाने या प्रकरणातून अंग काढून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी स्वत:च्या बदलीच्या हालचालींना वेग दिला आहे. कचरा प्रश्नाच्या टोलवाटोलवीत औरंगाबादकरांना आणखी काही दिवस या कोंडीचा त्रास सहन करावा लागणार हे निश्चित.शुक्रवार, १६ मार्चला कचरा कोंडीस एक महिना पूर्ण होत आहे. मागील एक महिन्यात महापालिका प्रशासनाला कचरा कोंडी फोडता आली नाही. विधानसभेत या मुद्यावर विरोधकांनी वनवा पेटविल्यानंतर राज्य शासन खडबडून जागे झाले. दुसºयाच दिवशी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी औरंगाबादेत पाठविण्यात आले. त्यांनी महापालिका आणि महसूल विभागाला पंचसूत्री कार्यक्रम आखून दिला. मागील चार दिवसांमध्ये या पंचसूत्रीवर मनपाने काहीच काम केले नाही. विभागीय आणि मनपा आयुक्त निव्वळ बैठकांवर बैठका घेण्यात मग्न आहेत. शहरात हजारो मेट्रिक टन कचरा पडून आहे. हा कचरा कसा दूर करता येईल, यावर अजिबात कृती करण्यात आलेली नाही. मनपा कचरा प्रश्नातून आपले अंग काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाने विभागीय आयुक्तांवर जबाबदारी सोपविली तर त्यांनीच संपूर्ण सोपस्कार पूर्ण करावेत अशा आविर्भावात मनपा प्रशासन वागत आहे.कचरा जाळणाºयांवर फौजदारीशहरात शेकडो ठिकाणी कचºयाचे डोंगर साचले आहेत. सकाळी आणि रात्री नागरिक दुर्गंधीमुळे कचºयाला आग लावत आहेत. त्यामुळे शहरात प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. आता यापुढे कचरा जाळणाºयांवर फौजदारी कारवाई करण्याचा फतवा मनपा प्रशासनाने काढला आहे. कचरा उचलायचे दायित्व सोडून प्रशासन आता सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल करणार का?सर्व काही आलबेल....मनपाच्या वॉर्ड अधिकाºयांपासून वरिष्ठांपर्यंत शहरात सर्व काही आलबेल आहे, असेच चित्र भासविण्यात येत आहे. सोमवारी प्रशासनाने एका बैठकीत दिलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. शहरातील नऊ प्रभागांपैकी सहा प्रभागांमध्ये फक्त १९०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. ४ हजार मेट्रिक टन कचरा उचलण्यात आल्याचा खोटा दावाही प्रशासनाने केला. वास्तविक पाहता शहरातील मुख्य रस्त्यांवर गल्लीबोळांत किमान ७ हजारांहून अधिक मेट्रिक टन कचरा पडून आहे.प्रक्रिया केंद्राची माहिती नाहीशहरात मनपाचे ९ प्रभाग आहेत. त्यातील सहा प्रभागांमध्ये ओला कचरा वेगळा करून खतनिर्मिती करण्यात येते, असा दावा मनपाकडून केला जात आहे. या सहा ठिकाणांच्या नावांची माहिती ‘लोकमत’ने मनपा प्रशासनाकडे मागितली आहे. रात्री उशिरापर्यंत ही सहा ठिकाणे कोणती हे मनपा प्रशासनाला सांगता आली नाही.