शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:24 IST

औरंगाबादचे ‘ए’ श्रेणीतील मॉडेल रेल्वेस्टेशन ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर उभे आहे. प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेस्टेशनवर वर्षाला सुमारे ५५ कोटींचे उत्पन्न मिळते. परंतु आजघडीला मॉडेल रेल्वेस्टेशन आणि परिसर समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.

ठळक मुद्देए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर : सुरक्षा व्यवस्थेकडे कानाडोळा, स्टेशन परिसर बनतोय बकाल

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबादचे ‘ए’ श्रेणीतील मॉडेल रेल्वेस्टेशन ए-१ श्रेणीच्या उंबरठ्यावर उभे आहे. प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेस्टेशनवर वर्षाला सुमारे ५५ कोटींचे उत्पन्न मिळते. परंतु आजघडीला मॉडेल रेल्वेस्टेशन आणि परिसर समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. जागोजागी अस्वच्छता, खड्डे, तुटलेले बॅरिकेटस्, ठिकठिकाणी वाळण्यासाठी टाकलेल्या कपड्यांनी रेल्वेस्टेशन परिसर बकाल होत आहे.ए-१ श्रेणीत समावेश होण्यासाठी ६० कोटींवर उत्पन्न आवश्यक असल्याने अवघ्या ५ ते ६ कोटींनी उत्पन्न वाढीची गरज आहे. या श्रेणीत समावेश झाल्यास अधिक गतीने रेल्वेस्टेशनचा विकास होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. परंतु ५५ कोटींचे उत्पन्न देणाऱ्या रेल्वेस्टेशनवर सोयी-सुविधांत सुधारणा आणि वाढ करण्याची गरज आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत दररोज हजारो प्रवासी, पर्यटक ये-जा करतात. परंतु रेल्वेस्टेशनची अवस्था पाहून नाराजी व्यक्त करण्याची वेळ येत आहे. रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वारासमोरील कमानीवरील फलकाची दुरवस्था झालेली आहे. या कमानीसमोरील रस्त्यावरील खड्डे आणि दगडांनीच प्रवाशांचे स्वागत होते. रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीसमोर कपडे वाळत घातले आहेत. हा प्रकार पाहून हे रेल्वेस्टेशन आहे की, धोबीघाट, असा प्रश्न क्षणभर ये-जा करणाºया प्रवाशांना पडतो. ठिकठिकाणी उघड्यावरच लघुशंका केली जाते. जुन्या इमारतीसमोरील ड्रेनेजच्या चेंबरची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. नव्या इमारतीसमोरील पोलीस चौकी बेवारस अवस्थेत असून अनेक जण अनधिकृत ताबा घेत आहेत. या चौकीचा आराम करण्यासाठी अनेकांकडून वापर केला जात आहे. रेल्वेस्टेशनवरील ही परिस्थिती दूर करण्याची मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे.मेटल डिटेक्टर बंदरेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीमध्ये प्रवेश करताना सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टर लावण्यात आले. परंतु आजघडीला ते बंदच असून, ते केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. याठिकाणी लावलेले लोखंडी बॅरिकेटस्ही काढण्यात आले. बॅरिकेटस्अभावी रेल्वेस्टेशनमध्ये ये-जा करणारे प्रवासी मेटल डिटेक्टरच्या बाजूने ये-जा करतात. त्यामुळे रेल्वेस्टेशनची सुरक्षा धोक्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन