शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद मनपाला मनुष्यबळ पुरविणार्‍या संस्थेची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 13:47 IST

चारशेपेक्षा अधिक कर्मचारी घेऊनही महापालिकेच्या कामकाजात कोणतीच सुधारणा नाही. मालमत्ता कराच्या वसुलीत वाढही नाही. वर्षाला सव्वाकोटी रुपये या कामावर खर्च होणार आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली. महापौरांनीही तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली.

ठळक मुद्देमहापालिकेने आऊटसोर्सिंगच्या नावावर मागील वर्षभरात खाजगी एजन्सीकडून मोठ्याप्रमाणात मनुष्यबळ घेतले.चारशेपेक्षा अधिक कर्मचारी घेऊनही महापालिकेच्या कामकाजात कोणतीच सुधारणा नाही. वर्षाला सव्वाकोटी रुपये या कामावर खर्च होणार आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली.

औरंगाबाद : महापालिकेने आऊटसोर्सिंगच्या नावावर मागील वर्षभरात खाजगी एजन्सीकडून मोठ्याप्रमाणात मनुष्यबळ घेतले. हे मनुष्यबळ प्रशिक्षित नाही. शैक्षणिक अर्हता नाही. चारशेपेक्षा अधिक कर्मचारी घेऊनही महापालिकेच्या कामकाजात कोणतीच सुधारणा नाही. मालमत्ता कराच्या वसुलीत वाढही नाही. वर्षाला सव्वाकोटी रुपये या कामावर खर्च होणार आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली. महापौरांनीही तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली.

सोमवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजू शिंदे यांनी ‘महाराणा’ सिक्युरिटी सर्व्हिसेस या संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एजन्सीने कंत्राटी कर्मचार्‍यांकडून पैसे घेतले, वेतन दिले नाही आदी आरोप केले. माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी एजन्सीची पूर्वी चौकशी सुरू असताना पुन्हा काम का दिले, असा मुद्दा उपस्थित केला. अफसर खान, संगीता वाघुले, नासेर सिद्दीकी यांंनी संबंधित एजन्सीचे काम थांबविण्याची मागणी केली. राजेंद्र जंजाळ यांनी अग्निशमन विभाग कर्मचार्‍यांकडे एकाच महाविद्यालयाचे प्रमाणपत्र असल्याचा आरोप केला. सभागृहनेते विकास जैन, उपमहापौर विजय औताडे यांनीही चौकशीची मागणी केली. महापौरांनी मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज, शहर अभियंता एस. डी. पानझडे, मुख्यलेखाधिकारी राम सोळुंके यांची समिती नियुक्त केली. 

नातेवाईकांचाच भरणाआऊटसोर्सिंगच्या माध्यमाने आतापर्यंत जेवढे कर्मचारी घेतले आहेत, त्यातील ९० टक्के कर्मचारी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींचेच नातेवाईक आहेत. या सर्व कर्मचार्‍यांचा पगार वार्षिक सव्वाकोटी रुपये होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी घेऊन महापालिकेला किंचितही फायदा झालेला नाही. मालमत्ता कराच्या वसुलीसाठी तब्बल १५० कर्मचार्‍यांची फौज उभी केली आहे. मात्र, वसुली पूर्वीप्रमाणेच सुरू आहे.

मंजुरी नसताना परस्पर नियुक्तीमहाराणा संस्थेकडून पगार दिला जात नसल्याचा आरोप सभागृहात नगरसेवकांकडून करण्यात आला. सभागृहात एक स्टेनोग्राफर बसला होता. त्याला पगार किती महिन्यांपासून झाला नाही, अशी विचारणा करण्यात आली. त्याने अडीच महिने असे उत्तर दिले. वास्तविक पाहता या कर्मचार्‍याची नियुक्तीच मनपाने केलेली नाही. अधिकार्‍यांंनी परस्पर नियुक्ती करून टाकली आहे. असे ४५ पेक्षा अधिक कर्मचारी असल्याची बाब समोर आली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद