शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-जळगाव महामार्गावर लावणार १९ हजार ५०० झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:44 IST

पर्यावरण समतोलासाठी नियमावली : एका झाडतोडीच्या मोबदल्यात पाच झाडे लावावी लागणार

रऊफ शेखफुलंब्री : औरंगाबाद -जळगाव महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरु असून गणोरी फाटा ते सिल्लोड हद्दीपर्यंत ३ हजार ९०० झाडे तोडण्यात आलेली आहेत. या झाडांची तोडणी परवानगी देताना वन विभागाने महामार्ग विभागाकडून एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावण्यात यावी, अशा प्रकारचा बाँड शासना नियमानुसार करून घेतला आहे, त्यामुळे संबंधित विभागाला आता त्याच्या मोबदल्यात १९ हजार ५०० झाडे लावावी लागणार आहेत. याची अंमलबजावणी होते की नाही, ये पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.शासनाने एक झाड तोडण्याच्या मोबदल्यात पाच झाडे लावण्याचा नियम केल्याने त्यानुसार या महामार्गावर वृक्षलागवड करावी लागणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना आपल्या गरजा भागविण्यासाठी शेतातील झाड तोडून विकता येईल, पण त्याच्या बदल्यात पाच पट झाडे लावावी लागतील, अशा प्रकारचा आदेश शासनाने काढला आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फायदा होणार असून वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठता येऊ शकेल.शेतकºयांना आपल्या शेतातील झाडे तोडण्यासाठी वन विभागाच्या वतीने परवानगी देण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याला एका झाडाच्या मोबदल्यात पाच झाडे लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. शासनाने काढलेल्या आदेश हा केवळ शेतकºयांना लागू होणार नसून तो सर्वांना लागू होणार आहे. यात लोकहिताचे काम करताना अथवा एखादा रस्ता रुंदीकरण करताना ठेकदाराकडून जी झाडे तोडली जातील, त्याच्या पाच पट झाडे त्या विभागाला लावणे बंधनकारक झाले आहे.झाडे तोडण्याची परवानगी आता वनविभागाकडेआता झाडे तोडायची असल्यास परवानगी घेण्यासाठी वन विभागाकडे जावे लागेल. कारण झाडे तोडण्याची परवानगी पूर्वी महसूल विभागाकडे होती. वन विभाग झाड तोडण्याची परवानगी मागणाºयाकडून एका झाडाच्या बदल्यात पाच झाड लावण्याच्या बाँड लिहून घेणार आहे. शंभर रुपयांच्या बाँडवर शपथपत्रशेतकºयांना आर्थिक अडचणीत आपल्या शेतातील झाडे तोडून विकता येऊ शकतात. त्यासाठी वन विभागाकडे सातबारा व एक अर्ज करावा. आमच्याकडून शंभर रुपयाच्या बाँडवर एका झाडाच्या मोबदल्यात पाच झाडे लावण्याचे शपथपत्र लिहून घेतले जाईल व त्यानंतरच परवानगी मिळेल, असे वन अधिकारी शिवाजी दहिवाल यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागenvironmentपर्यावरण