शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये सहा हजार कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग अखेर मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 06:08 IST

बिडकीनमध्ये प्रकल्प; रशियन कंपनी करणार गुंतवणूक

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : औरंगाबादनजीकच्या बिडकीनमध्ये नोवोलिपस्टेटक स्टील (एनएलएमके) ही रशियन कंपनी सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यासाठी करांमध्ये काही प्रोत्साहन देण्याची आणि त्यासाठीचा कालावधी वाढवून देण्याची कंपनीची मागणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील विशाल प्रकल्प धोरण उच्चाधिकार समितीने मान्य केली.

स्टील उद्योगक्षेत्रात आघाडीची एनएलएमके ही कंपनी पहिल्या टप्प्यात ८४० कोटी रुपयांची तर दुसऱ्या टप्प्यात ५ हजार कोटी रुपयांची अशी एकूण सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. उच्चाधिकार समितीने कंपनीची मागणी मान्य करताना आता कंपनीने पहिल्या टप्प्यात ४५ हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यासाठी तातडीने हालचाली कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. उच्चाधिकार समिती आता कंपनीला कर प्रोत्साहन देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीकडे पाठवेल. उच्चाधिकार समितीची शिफारस ही उपसमिती जसाच्या तसा स्वीकारते हा साधारणत: नेहमीचाच अनुभव आहे. त्यानुसार, आता एनएलमएके कंपनीला जीएसटी, मुद्रांक शुल्क आदींमध्ये विशेष प्रोत्साहन मिळेल. प्रोत्साहन सवलतीसाठीचा अवधी १५ वर्षांपर्यंत वाढवून द्यावा, अशी कंपनीची मागणी होती. मात्र, तो १२ वर्षांपर्यंत वाढवून देण्याचा निर्णय उच्चाधिकार समितीने घेतला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एनएलएमकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन औरंगाबादमध्ये गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर शासनाने कंपनीला प्रकल्पासाठी जमीनही उपलब्ध करून दिली होती. एनएलएमके ही जगातील अव्वल स्टील कंपन्यांमध्ये गणली जाते.आजच्या बैठकीला मुख्य सचिवन अजोय मेहता, जीएसटी कमिशनर संजीवकुमार, एमआयडीसीचे सीईओ पी.अनबलगन आदी उपस्थित होते.पहिलाच प्रकल्पएनएलएमके कंपनीचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असेल. त्याची उभारणी आॅरिक सिटीमध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) करण्यात येणार आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसी