शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद आयकॉन संघाने जिंकला राजुरी चषक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 21:17 IST

लोकमत समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांच्या नेतृत्वाखालील औरंगाबाद आयकॉन संघाने जबरदस्त कामगिरी करताना एडीसीए स्टेडियमवर शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात असोसिएशन सिव्हिल इंजिनिअर प्रॅक्टिस संघावर ६ गडी राखून विजय मिळवला.

ठळक मुद्दे सिव्हिल इंजिनिअर प्रॅक्टिस संघाने प्रथम फलंदाजी करताना १४.१ षटकांत ९ बाद ७८ धावा केल्या.औरंगाबाद आयकॉन संघाकडून नीलेश मित्तल याने सुरेख गोलंदाजी करताना अवघ्या २.१ षटकांत फक्त ७ धावा देऊन ३ गडी बाद केले.

औरंगाबाद - लोकमत समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा यांच्या नेतृत्वाखालील औरंगाबाद आयकॉन संघाने जबरदस्त कामगिरी करताना एडीसीए स्टेडियमवर शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात असोसिएशन सिव्हिल इंजिनिअर प्रॅक्टिस संघावर  ६ गडी राखून विजय मिळविताना राजुरी स्टीलतर्फे आयोजित राजुरी चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. नीलेश मित्तलची सुरेख गोलंदाजी हे औरंगाबाद आयकॉन संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

असोसिएशन सिव्हिल इंजिनिअर प्रॅक्टिस संघाने प्रथम फलंदाजी करताना १४.१ षटकांत ९ बाद ७८ धावा केल्या. त्यांच्याकडून मुजीब पठाण याने २६ चेंडूंत एका चौकारासह २० आणि कर्णधार नीरज देशपांडे याने १२ चेंडूंत २ चौकारांसह १४ धावांचे योगदान दिले. औरंगाबाद आयकॉन संघाकडून नीलेश मित्तल याने सुरेख गोलंदाजी करताना अवघ्या २.१ षटकांत फक्त ७ धावा देऊन ३ गडी बाद केले. त्याला प्रद्युम्न बजाजने १४ धावांत ३, लहरी वकीलने २० धावांत २ गडी बाद करून सुरेख साथ दिली. प्रत्युत्तरात औरंगाबाद आयकॉन संघाने विजयी लक्ष्य १४.१ षटकांत ४ गडी गमावून गाठले. 

त्यांच्याकडून  इब्राहिम अन्सारी याने स्फोटक फलंदाजी करताना अवघ्या १० चेंडूंतच ४ सणसणीत चौकारांसह सर्वाधिक २१ धाव केल्या. सुयोग माछरने २२ चेंडूंत एका चौकारासह १७, दलबीर सलुजाने १४ चेंडूंत एका चौकारासह १६ धावांचे निर्णायक योगदान दिले.  असोसिएशन सिव्हिल इंजिनिअर प्रॅक्टिस संघाकडून राहुल स्वामीने ११ धावांत २ गडी बाद केले. ७ दिवस रंगलेल्या या स्पर्धेत चॅम्पियन औरंगाबाद आयकॉनसह क्रेडाई, आयआयए, राजुरी इलाईट, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, एसीईपी, आयएसएसई, मसिआ, इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर, स्टील ट्रेडर्स असे १0 संघ सहभागी झाले होते.

अंतिम सामन्यानंतर नीर्लेप अपलायन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक मुकुंद भोगले, रुद्राणी इनफ्रास्टक्चरचे चेअरमन विवेक देशपांडे, लोकमत समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा, राजुरी स्टीलचे संचालक दिनेश राठी यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या व उपविजेत्या संघांना गौरविण्यात आले.  या प्रसंगी महावीर पाटणी (स्टील ट्रेडर्स असोसिएशन), अजय ठाकूर (आर्किटेक असोसिएशन माजी प्रेसिडेंट), सुनील कीर्दक (मसिआ प्रेसिडेंट), सुनील भाले (आर्किटेक्ट प्रसिडेंट), अजित मुळे (ग्रीन गोल्ड सीड्सचे कार्यकारी संचालक), विकास चौधरी (औरंगाबाद क्रेडाईचे उपाध्यक्ष), भूषण जोशी (आयएसएसईचे प्रेसिडेंट), रवींद्र करवंदे (औद्योगिक विकासक असोसिएशन प्रेसिडेंट), प्रमोद सावंत (एसीईपीचे माजी प्रेसिडेंट), बालाजी पाटील (निशा कन्स्ट्रक्शनचे संचालक) उपस्थित होते.ही स्पर्धा पंकज पांडे यांच्या मार्गदर्शनाखालील आयोजन समितीने यशस्वी केली.

स्पर्धेचे मानकरीमालिकावीर : मुजीब पठाणसामनावीर : नीलेश मित्तलफलंदाज : मोहित त्रिवेदीगोलंदाज : लहरी वकील.

संक्षिप्त धावफलकएसीई (पी) : १४.१ षटकांत ९ बाद ७८. (मुजीब पठाण २०, नीरज देशपांडे १४, नीलेश मित्तल ३/७, प्रद्युम्न बजाज ३/१४, लहरी वकील २/२०).औरंगाबाद आयकॉन : १४.१ षटकांत ४ बाद १७९. (इब्राहिम अन्सारी २१, सुयोग माछर १७, दलबीर सलुजा १६. राहुल स्वामी २/११, रंजन डागा १/५).