शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

पुरातत्व विभागाच्या 'मस्ट सी' यादीत औरंगाबादची ५ स्थळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 18:27 IST

यादीत महाराष्ट्रातील एकूण १० ठिकाणे आहेत.

ठळक मुद्दे५ स्मारके असणारे एकमेव शहरपर्यटन व्यावसायिकांना नवीन संधी

औरंगाबाद : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ‘मस्ट सी’ म्हणजे अवश्य बघावे, असे ऑनलाईन पोर्टल बनविले आहे. भारतात आल्यावर पर्यटकांनी अवश्य भेट द्यावी, अशा १३८ पर्यटनस्थळांची यादी यामध्ये असून, यापैकी महाराष्ट्रातील एकूण १० ठिकाणे आहेत. यापैकी ५ ठिकाणे औरंगाबाद जिल्ह्यात आहेत, ही औरंगाबादच्या पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

सोमवार दि. ९ डिसेंबर रोजी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना पर्यटन व सांस्कृतिकमंत्री प्रल्हाद पटेल यांनी या पोर्टलविषयी माहिती दिली. या स्मारकांच्या यादीमध्ये काही पुरातन साईटस् आहेत, तर काही ठिकाणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी आहेत. १३८ ठिकाणांपैकी सर्वाधिक ३१ ठिकाणे कर्नाटक येथील, १३ ठिकाणे मध्यप्रदेशातील, तर १० ठिकाणे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील ठिकाणांमध्ये अजिंठा लेणी, औरंगाबाद लेणी, छत्रपती शिवाजी टर्मिनल्स, दौलताबाद किल्ला, एलिफंटा केव्हज, वेरूळ लेणी, लोणार येथील मंदिरे, ग्वालीगृह किल्ला, पांडूलेणी आणि बीबी-का-मकबरा या स्थळांचा समावेश आहे. ५ ऐतिहासिक स्थळे असणारा या यादीतील औरंगाबाद हा एकमेव जिल्हा ठरू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावरूनच ऐतिहासिक वारसा दृष्टीने औरंगाबाद शहर किती महत्त्वाचे आहे, याचा अंदाज येतो.

पर्यटन व्यावसायिकांना नवीन संधी मिळतीलऔरंगाबादच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची बातमी आहे की, १३८ स्मारकांपैकी १० महाराष्ट्रात आहेत व त्यातही ५ औरंगाबादेत आहेत. यामुळे देश-विदेशातील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल. यातूनच रोजगार निर्मिती होऊन आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणावर होईल. पर्यटन व्यावसायिकांना नवीन संधी उपलब्ध होतील. पुरातत्व विभागाच्या या पोर्टलमुळे औरंगाबाद लेण्यांनाही नव्याने वाव मिळेल. यातून आपल्या राज्यासह विशेषत: औरंगाबाद शहराचे पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक स्तरावरील महत्त्व सिद्ध होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटक निवास व उपाहारगृह औरंगाबाद, अजिंठा, वेरूळ, फर्दापूर आणि राज्यभर असून, आम्ही पर्यटकांच्या सेवेत अहोरात्र उपलब्ध आहोत. पर्यटकांना विविध सेवा देताना आम्ही सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहोत. - चंद्रशेखर जयस्वाल, उपमहाव्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई.

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन