गंगापूर (जि. औरंगाबाद) : गंगापूर तालुक्यात भेंडाळा, पाखोरा या गावांतील विविध कार्यकारी सोसायटीचे काम पाहणारे गटसचिव मनोज ऊर्फ बंडू रुस्तुम चव्हाण (३९) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तालुक्यातील गटसचिवांचा पगार वेळेवर होत नसल्यामुळेत्यांनी आपली किडनी विकण्याची परवानगी शासनाकडे मागितली होती.गंगापूर शहरातील लक्ष्मी कॉलनी येथील मनोज चव्हाण यांना गेल्या ४८ महिन्यांपासून पगार मिळाला नाही. आर्थिक विवंचनेत असताना दीपावली सणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी २० हजार रुपये उसनवार करून घरात किराणा, कपडालत्ता आणला होता. गुरुवारी पहाटे ४च्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र ४.३० वाजता तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.२० गटसचिवांचा ४ वर्षांपासून पगार बंदगंगापूर तालुक्यात एकूण २७ गटसचिवांपैकी २० गटसचिवांचा ४ वर्षांपासून पगार बंद आहे, तर यातील एका गटसचिवाला गेल्या ७२ महिन्यांपासून पगार मिळाला नाही.
औरंगाबादेत गटसचिवाचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 03:37 IST