शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

औरंगाबाद : ईद-उल-फित्र उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागातील १५ ईदगाह आणि जवळपास ७५ मशिदींमध्ये मुख्य नमाज अदा करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागातील १५ ईदगाह आणि जवळपास ७५ मशिदींमध्ये मुख्य नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात रमजान ईद (ईद-उल-फित्र) साजरी केली. नमाजपूर्वी सकाळी ‘फितरा’ आणि ‘जकात’ देऊन नमाज अदा करण्यात आली. तर नमाजनंतर परस्परांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या घेतल्या जात होत्या.

छावणीतील ईदगाहमध्ये जामा मशिदीचे पेश इमाम हाफीज जाकीर साहब यांच्या नेतृत्वात प्रचंड मोठ्या जमावाने ईदची मुख्य नमाज अदा केली. तत्पूर्वी मोईज फारुकी, नुमार्इंदा कौन्सिलचे नोमान नदवी, जमाते इस्लामीचे मौलाना इलियास पलाही तसेच मौलाना महंमद मजिदुद्दीन फारुकी यांनी प्रास्ताविकपर बयान केले. त्यांनी पवित्र रमजान महिन्याचे, रोजांचे, खैरात आणि फितराचे महत्त्व विशद केले.छावणी ईदगाहसमोर वक्फ बोर्डातर्फे उभारण्यात आलेल्या मंडपात ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आ. सुभाष झांबड, आ. सतीश चव्हाण, आ. इम्तियाज जलील, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे आणि रामेश्वर थोरात, तसेच नामदेव पवार, माजी महापौर रशीद खान (मामू), मनमोहनसिंग ओबेरॉय आणि अशोक सायन्ना यादव, डॉ. खुशालचंद बाहेती, नगरसेविका कीर्ती शिंदे, महेंद्र शिंदे, डॉ.जफरखान, पंकज फुलफगर, मजीदुल्ला बर्कतुल्ला, मतीन अहेमद, शेख युसूफ, इब्राहिमभाई पटेल, रफिक अहेमद, शिवनाथ राठी, अ‍ॅड. अक्रम खान, बबन डिडोरे, डॉ. पवन डोंगरे, जेम्स अंबिलढगे, दौलतराव मोरे, डॉ. डॉन अंबिलढगे, मनोज निर्मळ, कमाल खान पठाण, जितेंद्र देहाडे आदी मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.नमाजनंतर भाविकांनी कब्रस्तानात जावून त्यांच्या पूर्वजांच्या कबरेवर फुले वाहून दुआ केली.छावणीतील कब्रस्तान समितीचे चेअरमन अब्दुल वहीद, सचिव हमीद खान, सहसचिव इक्बाल खान, सदस्य अश्फाक खान, आमेर खान इक्बाल खान, एम .ए. अजहर, रफिक अहेमद, शेख कासीम आदींनी ईदगाहची साफसफाई, रंगरंगोटी, नमाजसाठी उपस्थित भाविकांच्या बैठकीची व्यवस्था आणि महापालिकेने ‘वजू’ साठी पाण्याची व्यवस्था केली.

टॅग्स :Ramzan Eidरमजान ईदAurangabadऔरंगाबादRajendra Dardaराजेंद्र दर्डा