शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ‘सर्वपित्री’ नंतर बदलण्याची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 11:33 IST

सर्वपित्री अमावास्येनंतर पालकमंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू

औरंगाबाद : जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याच्या हालचालींना मुंबईस्तरावर वेग आला आहे. सर्वपित्री अमावास्येनंतर पालकमंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, राज्यमंत्री दादा भुसे आणि अर्जुन खोतकर यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. खोतकर यांच्या नावाला विरोध होत असला तरी त्यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी येणार असल्याचे बोलले जात आहे.

विद्यमान पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या आमदारकीचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपला. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांपर्यंतच त्या पदावर राहणे शक्य आहे. अतिरिक्त सहा महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ जानेवारी २०१९ मध्ये संपण्यापूर्वीच त्यांच्या जागेवर भुसे किंवा खोतकर यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. ८ जानेवारी २०१५ रोजी रामदास कदम यांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतली. त्यानंतर १५ जानेवारी २०१८ रोजी कदम यांना पदावरून हटविण्यात आले. खा. चंद्रकांत खैरे आणि कदम यांच्यातील राजकीय सुंदोपसुंदीमुळे कदमांकडून औरंगाबादचे पालकमंत्री पद काढून घेण्यात आले. त्यांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांची वर्णी लावण्यात आली. 

अलीकडच्या ९ महिन्यांत डॉ. सावंत यांना जिल्ह्यात ठसा उमटविणारे काम करता आले नाही. ९ महिन्यांत कचरा समस्या, बीड बायपास, समांतर जलवाहिनी, प्राधिकरण विकासकामांबाबत त्यांना काहीही करता आले नाही. जिल्हा नियोजन बैठक आणि इतर सरकारी कार्यक्रमांपुरतेच ते शहरात आले. तसेच खा. खैरे आणि सावंत यांच्यात कदम यांनी मंजूर केलेल्या नियोजन समितीच्या कामांमध्ये कपात करण्यावरून वाद झाल्याची चर्चा मध्यंतरी होती. त्यातच सावंत यांचा विधान परिषद सदस्य पदाचा कार्यकाळ संपला. त्यामुळे त्यांनीही बैठकीपुरतीच पालकमंत्री पदाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली. दरम्यान गेल्या आठवड्यात जिल्हा नियोजन विभागाने मुंबईला विकासकामांचा सगळा दस्तावेज घेऊन डॉ. सावंत यांच्याकडे एका बैठकीला हजेरी लावली. कदाचित संभाव्य बदलांमुळेच डॉ. सावंत यांनी त्या बैठकीचे आयोजन केले असावे.

खोतकरांना स्थानिक नेत्यांचा विरोधराज्यमंत्री खोतकर किंवा दादा भुसे यांच्यापैकी एकावर पालकमंत्री पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. खोतकर यांच्या नावाची चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती; परंतु त्यांच्या नावालादेखील स्थानिक सेना नेत्यांचा विरोध आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून खोतकर यांना शिवसेनेने मैदानात उतरविण्याचा विचार पक्का केला असेल तर खोतकर पालकमंत्री होणे शक्य आहे, पक्षातील मतभेदांचा विचार झाला तर भुसे यांच्याकडे पदाची जबाबदारी देण्याबाबत विचार होईल, अशी चर्चा आहे. 

टॅग्स :dr. deepak sawantदीपक सावंतguardian ministerपालक मंत्रीArjun Khotkarअर्जुन खोतकरAurangabadऔरंगाबाद