शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात २२ मे पासून रेड आणि नॉन रेडझोन असे दोन भाग असणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 16:27 IST

नॉन रेडझोन भागात सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट, मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल्स, बार वगळून सर्व काही सुरू राहणे शक्य होणार

ठळक मुद्देतालुक्यांतर्गत सुरू होणार एस.टी. बस सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत लॉकडाऊनमधून सूट

औरंगाबाद : जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण शहराच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे २२ मेपासून औरंगाबाद शहर रेडझोनमध्ये, तर उर्वरित सर्व भाग नॉन रेडझोनमध्ये असणार आहे. नॉन रेडझोन भागात सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट, मद्यविक्रीची दुकाने, हॉटेल्स, बार वगळून सर्व काही सुरू राहणे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मंगळवारी सांगितले, तसेच तालुक्यातून तालुक्यात जाण्यासाठी एस.टी.सेवा सुरू करण्यात येणार असून, शहरात एस.टी. बंद असेल. ज्यांना तालुक्यातून शहरात यायचे असेल त्यांना मनपाच्या सीमेपर्यंत आणून सोडण्यात येईल, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, ग्रामीण भागात २२ मे पासून सायंकाळी ७ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू असेल. महापालिका परिसर रेडझोनमध्ये आहे. त्याबाबत मनपा आयुक्त निर्णय घेतील. २२ मेपासून ३१ मेपर्यंत ग्रामीण भागासाठी मुख्य सचिवांच्या सूचनेनुसार आदेश पारित करण्यात येणार आहेत. या आदेशात काही अटी व शर्तींचा उल्लेख आहे. त्याचे अवलोकन करून जिल्हा प्रशासन आदेश काढणार आहे. 

एस.टी.मध्ये सोशल डिस्टन्सिंंगचा वापरजिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, २२ मेपासून एस.टी. बस सुरू करण्यात येत आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंंगचा वापर करून प्रवासी वाहतूक सुरू होईल. एका बसमध्ये  २२ ते २५ प्रवासी सोशल डिस्टन्सिंंगनुसार प्रवास करू शकतील. पैठण ते कन्नड, सिल्लोड ते कन्नड, गंगापूर ते वैजापूर अशा पद्धतीने एस.टी. सेवा सुरू होईल. पालिका हद्दीतील कोणत्याही स्थानकावर एस.टी. बस ये-जा करणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद