शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात पथदिव्यांची दीडशे कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 13:10 IST

औरंगाबाद परिमंडळांतर्गत वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून, वसुलीसाठी संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणचे अधिकारी करीत आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद परिमंडळांतर्गत वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून, वसुलीसाठी संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणचे अधिकारी करीत आहेत. औरंगाबाद परिमंडळातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पथदिव्यांची थकबाकी १४८ कोटी ४७ लाख रुपये एवढी आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पथदिव्यांचे औरंगाबाद तालुक्यात ३१६ ग्राहक असून, त्यांच्याकडे १० कोटी ५८ लाख रुपये, पैठण तालुक्यात ३६७ ग्राहकांकडे ३७ कोटी ३० लाख रुपये थकबाकी आहे.गंगापूर तालुक्यात ३४९ वीज ग्राहकांकडे २२ कोटी ९२ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. खुलताबाद तालुक्यात १२७ वीज ग्राहकांकडे ०४ कोटी ७३ लाख रुपयांची थकबाकी आहे. फुलंब्री तालुक्यात १०४ वीज ग्राहकांकडे ९ कोटी ५२ लाख रुपये, तर कन्नड तालुक्यात १८९ वीज ग्राहकांकडे १० कोटी २२ लाख रुपये थकबाकी आहे.वैजापूर तालुक्यात २४४ वीज ग्राहकांकडे १८ कोटी ९० लाख रुपये, सिल्लोड तालुक्यात २५२ वीज ग्राहकांकडे २४ कोटी ७१ लाख रुपये, सोयगाव तालुक्यात १२६ वीज ग्राहकांकडे ९ कोटी ५७ लाख रुपये थकबाकी आहे.

थकीत वीज बिल भरण्याचे आवाहन औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांचे २ हजार ७४ वीज ग्राहक असून, त्यांच्याकडे १४८ कोटी ४७ लाख एवढी थकबाकी आहे. ग्रामपंचायतींनी पथदिव्यांच्या वीज बिलाची थकबाकी तात्काळ भरावी, अन्यथा प्रतिसाद न देणार्‍या ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणMONEYपैसाgram panchayatग्राम पंचायतroad safetyरस्ते सुरक्षा