शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे जिल्हा नियोजन सभागृह होणार टकाटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 19:47 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृह हायटेक तंत्राचा वापर करून टकाटक करण्यात येणार आहे. ३१ मार्चपूर्वी हे सभागृह नूतनीकरण करून बैठकीसाठी सज्ज करण्यात येणार असून, त्यावर २ कोटींच्या आसपास खर्च होणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्दे३१ मार्चपूर्वी हे सभागृह नूतनीकरण करून बैठकीसाठी सज्ज करण्यात येणार आहे त्यावर २ कोटींच्या आसपास खर्च होणे अपेक्षित आहे. जिल्हा नियोजन समितीने त्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

- विकास राऊत 

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृह हायटेक तंत्राचा वापर करून टकाटक करण्यात येणार आहे. ३१ मार्चपूर्वी हे सभागृह नूतनीकरण करून बैठकीसाठी सज्ज करण्यात येणार असून, त्यावर २ कोटींच्या आसपास खर्च होणे अपेक्षित आहे. जिल्हा नियोजन समितीने त्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वाढीव खर्च कार्याेत्तर मंजुरीने मिळविण्यात येणार आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या सभागृहाचे काम बुधवारी हाती घेण्यात आले. सभागृहातील जुने फर्निचर, वातानुकूलित यंत्रणा, ध्वनियंत्रणा, इलेक्ट्रिक फिटिंग काढण्याचे काम सुरू आहे. सभागृहाचे प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचा मार्ग प्रशस्त करण्यात येणार आहे. तसेच संकटकालीन मार्गातील अडथळेदेखील दूर करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी सभागृह प्रवेशद्वारासमोर शॉर्ट सर्किट होऊ न लागलेल्या आगीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली होती. सध्या सभागृहात ये-जा करण्याचे मार्ग अरुंद आहेत. प्रशासनगृहाची व्यवस्था नाही. आपत्कालीन मार्ग अडगळीचा झालेला आहे. तसेच स्नॅक्स चेंबरमध्येही प्रचंड अडचण आहे. त्यामुळे सभागृहाला कोंडवाड्याचे स्वरूप आलेले आहे. पावसाळ्यात सभागृहाला गळतीही लागते. शिवाय विद्यमान वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त आहे. दुरुस्ती व सुशोभीकरणाच्या कामात ही सगळी कामे करण्यात येणार आहेत. 

अधीक्षक अभियंत्यांचा दावा मनपा किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहाप्रमाणे डीपीसी सभागृहाचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले. १ कोटी रुपयांची तरतूद त्या कामासाठी आहे. परंतु चांगले काम करायचे असेल तर त्यासाठी जास्तीचा वाढीव खर्च लागू शकेल. जिल्हाधिकार्‍यांशी त्याप्रकरणी चर्चा केली आहे. २ कोटींच्या आतच खर्च होईल; परंतु सभागृह अतिशय चांगले होईल. असा दावा त्यांनी केला. 

काय असेल सभागृहात- १५० सदस्य बसण्याची व्यवस्था- वातानुकूलित सभागृह- व्यासपीठावर स्वतंत्र आसन व्यवस्था- प्रत्येक डेस्कवर चार माईक- मनपाच्या धर्तीवर सभागृह- एअरसाऊंड सिस्टीम- एलईडी स्क्रीन व प्रेस गॅलरी 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद