शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाला दिली १४ कोटींची तूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:44 IST

यंदा खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडल्याने शासनाला हस्तक्षेप करीत ५४५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देऊन तूर खरेदी करावी लागत आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत २८२५ शेतकºयांनी २४९६७.५० क्विंटल तूर शासनाला विकली. या तुरीची किंमत १३ कोटी ६० लाख रुपये एवढी आहे.

ठळक मुद्दे१५ मेपर्यंत खरेदीची मुदत : पैठणमध्ये सर्वाधिक तूर खरेदी; हमी भावानंतरही बाजारात तुरीचे भाव पडलेलेच

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : यंदा खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडल्याने शासनाला हस्तक्षेप करीत ५४५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देऊन तूर खरेदी करावी लागत आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांत २८२५ शेतकºयांनी २४९६७.५० क्विंटल तूर शासनाला विकली. या तुरीची किंमत १३ कोटी ६० लाख रुपये एवढी आहे.शासनाने यंदा तुरीचा हमीभाव ५४५० रुपये प्रतिक्विंटल ठेवले होते. फेब्रुवारी महिन्यात जाधववाडी येथील धान्याच्या अडत बाजारात ४२०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल तूर विक्री झाली होती. कारण, उत्पादन चांगले असल्याने खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडले होते. अखेर नाफेड अंतर्गत मार्केटिंग फेडरेशनच्या नियंत्रणाखाली ३ फेब्रुवारी रोजी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर खरेदीला सुरुवात झाली. त्यानंतर जिल्ह्यात आणखी ४ तालुक्यांत खरेदी केंद्र सुरूकरण्यात आले. मागील वर्षी शेतकºयांच्या नावाखाली व्यापाºयांनी शासनाला मोठ्या प्रमाणात तूर विकल्याच्या घटना घडल्यामुळे यंदा खरेदीची पद्धत बदलण्यात आली होती. प्रथम शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करण्यात येत होती. त्यानुसार तुरीची खरेदी करण्यात येत आहे. १५ मेपर्यंत तूर खरेदीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. जाधववाडीत शासकीय खरेदी केंद्रावर ३८९ शेतकºयांची ३१८३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. पैठणमध्ये सर्वाधिक १३५७ शेतकºयांनी १४०४०.५० क्विंटल तूर शासनाला विकली. वैजापूर २९४ शेतकºयांनी १९१८.५० क्विंटल तूर, खुलताबादमध्ये ४०३ शेतकºयांनी २८१३.५० क्विंटल तूर शासनाला विकली. विशेष म्हणजे, ३४३० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र, त्यातील २८२५ शेतकºयांनीच हमीभावात तूर विकली. हमीभावानुसार २४९६७.५० क्विंटल तूर १३ कोटी ६० लाख ७२ हजार ८७५ रुपयांची आहे. उल्लेखनीय म्हणजे शासकीय खरेदी सुरू झाल्यानंतर अडत बाजारात तुरीचे भाव वाढतील, असा अंदाज होता पण तो फोल ठरला. त्यानंतर तुरीचे भाव आणखी घसरले.आजघडीला खुल्या बाजारात ३७०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटलने तूर खरेदी केली जात आहे. ज्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्री केली त्यातील १५ टक्के लोकांच्या बँक खात्यात अजूनही रक्कम जमा झाली नाही. मागील वर्षी भरघोस उत्पादनामुळे शासनाने खरेदी केंद्रावर ८१ हजार क्विंटल तूर खरेदी केली होती.१ कोटी ५५ लाखांचा हरभरासरकारने तुरीपाठोपाठ हरभराची खरेदी करण्यास सुरुवात केली. हरभराला ४४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात आला. ५ तालुक्यांतील शासकीय खरेदी केंद्रांवर ५२८ शेतकºयांनीच ५८१२.५० क्विंटल हरभरा विक्री केला. १ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा हा हरभरा सध्या शासकीय खरेदी केंद्रात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी सी. डी. खांडे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र